Amit Deshmukh 
मराठवाडा

महत्त्वाची बातमी : आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्याही परीक्षा पुढे ढकलल्या

सुशांत सांगवे

लातूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत उन्हाळ्यात घेतल्या जाणाऱ्या पदवी व पदव्युत्तर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी शुक्रवारी येथे दिली.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठीक्लिक करा

विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेबाबत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी प्रा. डॉ. मोहन खामगावकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली. सर्व वैद्यकीय शाखांचे अधिष्ठाता तसेच केंद्रीय परिषदेचे सदस्य डॉ. दर्शन दक्षिणदास, डॉ. कैलाश शर्मा व व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. एस.एस. सावरीकर हे यात सहभागी झाले होते.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठीक्लिक करा

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर 2020 च्या परीक्षा पुढील सूचना मिळेपर्यंत पुढे ढकलण्यात याव्यात, या परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठांशी संलग्न असणाऱ्या प्रमुख संस्था, अध्यापक, पालक व विद्यार्थ्यांशी परामर्श करून त्यानंतर घेण्यात याव्यात तसेच परीक्षांचे अंतिम वेळापत्रक निश्चित करताना केंद्रीय परिषदांशी समन्वय साधून विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यासाठी पर्याप्त कालावधी उपलब्ध करून देण्यात यावा... अशा शिफारशी करण्यात आल्या होत्या. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या या परीक्षांच्या संदर्भात विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच, विद्यापीठाच्या कोणत्याही परिपत्रकाची खातरजमा करण्यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील माहिती ग्राह्य धरावी.
- अमित देशमुख, वैद्यकीय शिक्षणमंत्री.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: सुप्रीम कोर्टाचा सरकारला कडक इशारा! दोषमुक्तीच्या याचिकांवर विलंब केला तर थेट अवमान कारवाई... इतर राज्यांना संदेश

Washim News: सहकार क्षेत्रात नव्या नेतृत्वाची एन्ट्री;जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर; दिग्गजांना हादरा

Latest Marathi News Live Update : पुढील चार दिवस राज्यात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता

Pimpri News: अपघात आणि बेपत्ता नोंद एकाच पोलीस ठाण्यात, तरी तपासाची तसदी घेतली नाही; CRPF जवानाच्या मृत्यूचा ५ दिवसांनी उलगडा..

Buldhana News: तहसीलदारावर टिप्पर घालण्याचा प्रयत्न; रेतीमाफियांची मुजोरी वाढली; सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले वाहन

SCROLL FOR NEXT