z p
z p  
मराठवाडा

कामं वेळेत केली नाहीत, अधिकारी असा गेला घरी की....

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहातील विविध प्रलंबित कामे वेळेवर केली नसल्याने शाखा अभियंता डी. व्ही. धुळेकर यांच्यावर गुरुवारी (ता.२१) निलंबनाची कारवाई करण्यात आली. शनिवारी (ता.आठ) सर्वसाधारण सभेत सभागृहातील मोडक्या खुर्च्यांचा मुद्दा उपस्थित करुन सदस्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले होते. 

जिल्हा परिषदेच्या कारभारी निवडीनंतर शनिवारी (ता.२१) आयोजित पहिल्याच सर्वसाधारण सभेत सदस्यांनी सभागृहातील मोडक्या खुर्च्यांचा मुद्दा लावून धरत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. जिल्हा परिषद मुख्यालय इमारतीच्या डागडूजीसाठी एक कोटी ३० लाख रुपये खर्च करण्यात येत असले तरी सभागृहातील मोडक्या फर्निचरकडे दुर्लक्ष होत असल्याचा संताप सदस्यांनी व्यक्त केला. 

खुर्च्यांची अवस्था ‘जैसे थे’

अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांना तातडीने खुर्च्या दुरुस्तीचे आदेश दिले होते. त्यानुसार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी यांनी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.करपे यांना तातडीने खुर्च्या दूरुस्तीच्या सूचना दिल्या.

मात्र, खुर्च्या दुरुस्तीचे तातडीचे आदेश जारी करुनही बुधवारी (ता.१९) सभागृहामध्ये शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात खुर्च्यांची अवस्था ‘जैसे थे’ दिसून आल्याने अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांनी संताप व्यक्त केला. सभागृहातील मोडक्या खुर्च्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेऊन संबंधितावर तत्काळ कारवाईचे आदेश अध्यक्षा सौ. अंबुलगेकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले. 

तडकाफडकी कारवाईचे आदेश जारी 

कार्यकारी अभियंता यांच्याकडून खुर्च्या दुरुस्तीबाबत कसल्याच प्रकारचा ‘टाईम बॉँड’ आदेश प्राप्त झाला नाही. सभागृहामध्ये उपस्थित झालेल्या दुरुस्ती मुद्याची अंमलबजावणी येत्या सर्वसाधारण सभेपर्यंत करता येईल, अशा धारणा ठेवल्याची भावना बांधकाम उपविभागाचे निलंबित शाखा अभियंता डी. व्ही. धुळेकर यांनी व्यक्त केली.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित शिवजयंती उत्सवासाठी बुधवारी (ता. १९) अध्यक्षा मंगणाराणी अंबुलगेकर यांनी मोडक्या खुर्च्यांविषयी संताप व्यक्त करत तडकाफडकी कारवाईचे आदेश जारी केले. पण कार्यकारी अभियंता श्री. करपे यांनी वरिष्ठांचे आदेश उपविभागाकडे वर्ग केले नसल्याची चर्चा दिवसभर रंगली होती.  

देगलूर पंचायत समिती कार्यालयात करावे लागणार कर्तव्य
शाखा अभियंता डी. व्ही. धुळेकर यांच्यावर कर्तव्यात कसुर केल्याचा ठपका ठेऊन गुरुवारी (ता.२१) निलंबित करण्यात आले. दरम्यान, निलंबन आदेश निर्गमित झाल्यापासून शाखा अभियंता डी. व्ही. धुळेकर यांना देगलूर पंचायत समिती कार्यालयात कर्तव्य बजवावे लागणार आहे.

याशिवाय निलंबन काळात कोणताही खाजगी व्यवसाय करता येणार नाही, तसे आढळून आल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेशही मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT