Famer Suicide Bhokardan Jalna News
Famer Suicide Bhokardan Jalna News 
मराठवाडा

बँक, खासगी सावकार उठले जीवावर; पत्नी, मुलांना सोडून शेतकऱ्याने घेतले विषारी औषध

आनंद इंदानी

बदनापूर (जि.जालना) : बदनापूर तालुक्यातील हलदोला येथील शेतकऱ्याने बँक आणि खासगी सावकाराच्या कर्जाला कंटाळून गुरुवारी (ता.चार) पहाटे चार वाजता विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे. त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिट्ठीत त्यांची कर्जाची मुद्दल भरण्याची तयारी असताना बँकेने घराची जप्ती करण्याचा इशारा दिला,  तर खासगी सावकाराचे कर्ज फेडूनही धमक्या मिळत असल्याचे नमूद केले आहे. देविदास विठ्ठलराव मात्रे ( वय 52) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे हलदोला शिवारात 7 एकर शेती आहे. त्यांच्यावर बँक आणि खासगी सावकाराचे कर्ज होते.

मात्र सततच्या नापिकीमुळे त्यांना आर्थिक विवंचना सतावत होती. त्यातच बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना दोनदा कर्जवसुलीसाठी नोटीस पाठवली होती. अर्थात बँकेच्या कर्जाची मुद्दल भरण्यास ते तयार होते. मात्र बँकेच्या अधिकाऱ्यांनी घरावर जप्ती आणू असा इशारा दिला होता. त्यात खासगी सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची भरपाई करून देखील त्यांनी कर्जपोटी दिलेले धनादेश परत केले नाही. शिवाय त्यांच्याकडून धमक्याही मिळत होत्या. अशा विवंचनेत त्यांनी आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले.

दरम्यान, त्यांना उपचारासाठी जालना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दुर्दैवाने उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुले, सुना, विवाहित मुलगी, जावई असा मोठा परिवार आहे. या संदर्भात माजी सरपंच तात्यासाहेब मात्रे म्हणाले की, आत्महत्याग्रस्त शेतकरी देविदास मात्रे यांच्याकडे सेलगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे 9 लाख रुपये कर्ज होते. मी स्वतः त्यांच्यासोबत बँकेत जाऊन तडजोड करण्याचा प्रयत्न केला. मात्र बँकेच्या अधिकाऱ्यांनी ताठर भूमिका घेतल्याने त्यांची विवंचना वाढली होती, असे स्पष्ट केले.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश? पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी लावली हजेरी

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईच्या गोलंदाजांची कमाल, केकेआरला पॉवर प्लेमध्येच दिले चार धक्के

Rohit Sharma MI vs KKR : टी 20 वर्ल्डकपचा संघ जाहीर होताच मुंबईच्या प्लेईंग 11 मधून रोहितचं नाव गायब, काय आहे कारण?

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT