Farmer Suicide esakal
मराठवाडा

वडिलांच्या वर्षश्राद्धाचा कार्यक्रम झाला आणि मुलाने केली आत्महत्या

वडिलांच्या वर्षश्राद्धाचा कार्यक्रम झाला आणि मुलगा ज्ञानेश्वर महागोविंद यांनी विष प्राशन करत आत्महत्या केली.

कमलेश जाब्रस

माजलगाव (जि.बीड) : मागील तीन ते चार दिवसांपूर्वी वडिलांच्या वर्षश्राद्धाचा कार्यक्रम झाला आणि मुलगा ज्ञानेश्वर बाबुराव महागोविंद (वय ३३) यांनी विष प्राशन करत आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील राजेवाडी येथे शुक्रवारी (ता.१७) घडली आहे. या घटनेने राजेवाडीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्यातील (Majalgaon) राजेवाडी येथील शेतकरी ज्ञानेश्वर बाबुराव महागोविंद यांना दोन एकर कोरडवाहू शेतजमीन आहे. या शेतात ते कपाशी, सोयाबीन, तूर, मूग, उडीद असे (Beed) पारंपरिक पिकांची लागवड करतात. मागील वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतातील पुरते उत्पन्न हाती आले नाही. परिणामी त्यांनी खासगी बॅंकेकडुन कर्ज घेतले. (Farmer Committed Suicide In Majalgaon Taluka Of Beed)

हे कर्ज फेडणे जिकीरीचे जात असल्यामुळे आणि कर्जबाजारीपणात गेलेल्या या शेतकऱ्याने टोकाचे पाउल उचलत विष प्राशन करून आत्महत्या केली. मागील वर्षीच ज्ञानेश्वर यांचे वडील बाबुराव महागोविंद यांनी देखील कर्जबाजारीपणास कंटाळुनच आत्महत्या (Farmer Suicide) केली आहे. या घटनेने राजेवाडी गावावर शोककळा पसरली आहे.

दरम्यान ज्ञानेश्वर महागोविंद यांच्या पश्चात वृध्द आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. मृत्युची नोंद दिंद्रुड पोलिस ठाण्यात करण्यात आली असुन पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रभा पुंडगे या करित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT