मंठा : उगवण झालेल्या खरीप पिकाची कोळपणी करताना शेतकरी.  
मराठवाडा

वेळेवर पाऊस पडल्याने पेरण्या पूर्ण 

कृष्णा भावसार

मंठा (जि.जालना) - जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाला सुरवात झाली. यंदा दमदार पाऊस पडल्याने तालुक्यातील खरिपाच्या पेरण्या जवळपास पूर्ण झाल्या आहेत. पेरणी झालेल्या कपाशी, तूर, उडीद, मूग या पिकांची उगवणदेखील चांगली झाली आहे. 

दरम्यान, सोयाबीनची पेरणी वेळेवर होऊन देखील बियाणात दोष निघाला. अनेक ठिकाणी सोयाबीनची उगवण झाली नाही. जवळपास ४६५ शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या बियाणात दोष असल्याबाबतच्या तक्रारी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात केल्या आहेत. 

जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात पेरणीयोग्य ६५ हजार ८४७ हेक्टर क्षेत्रापैकी शुक्रवारपर्यंत (ता. १०) ६५ हजार १९८ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली. कपाशी पिकास मेहनत व खर्च जास्त लागतो; तसेच विक्रीकरिता अनेक अडचणी येतात. त्यामुळे शेतकरी यावर्षी कपाशीऐवजी इतर पिकांची निवड करणार असे वाटत होते; परंतु मागील वर्षीचा कापूस विक्री वाचून घरात पडून असताना देखील शेतकऱ्यांनी २२ हजार ११५ हेक्टर क्षेत्रात कपाशीची लागवड केली आहे. तर सोयाबीनची २९ हजार ३३ हेक्टर, तुरीची ६ हजार ३१५ हेक्टर, मुगाची ४ हजार ९१२ हेक्टर, उडिदाची २ हजार २३१ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे.

तालुक्‍यात दमदार व वेळेवर पाऊस पडल्याने उगवण होऊन चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे तालुक्यात सर्वत्र उत्साही वातावरण असून, शेतकरी सध्या पीक आंतरमशागतीच्या कामात गुंतला आहे. कापूस, उडीद, मूग, तूर, सोयाबीन या पिकांची कोळपणी, खुरपणी, रासायनिक खत देणे व कीटकनाशक फवारणीच्या कामांनी वेग घेतला आहे. 

सर्वच मंडळांत दमदार पाऊस 

यावर्षी तालुक्यातील सर्वच मंडळांत दमदार पाऊस पडला असून, शुक्रवारी (ता. १०) सकाळपर्यंत तालुक्यात सरासरी २८४ मिलिमीटर पाऊस पडला आहे. यात मंठा मंडळात २७४ मिलिमीटर, ढोकसाळ मंडळात ३२९ मिलिमीटर, तळणी मंडळात २६८ मिलिमीटर, पांगरी गोसावी मंडळात २६४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

(संपादन : संजय कुलकर्णी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT