पावसाविना पिकाचे झालेले हाल. 
मराठवाडा

कसे रुजावे बियाणे... 

संजय राऊत

टेंभुर्णी  (जि.जालना) - शेतकऱ्यांनी घाम गाळून लागवड केलेले कपाशीचे बियाणे अंकुरण्यास सुरवात झालेली असतानाच जालना जिल्ह्यातील टेंभुर्णी आठवडाभरापासून परिसरात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे कपाशीचे अंकुर आता कोमेजू लागले आहेत. 

मृग नक्षत्रात सोमवारी (ता.१४) परिसरात जोरदार पाऊस झाल्याने पेरणी, लागवडीच्या कामाने वेग घेतला होता. यंदा कपाशीची लागवड ही परिसरात मोठ्या प्रमाणावर झाली.

दरम्यान सोमवारनंतर पावसाने उघडीप दिली आहे. यामुळे बियाणे अंकुरत असतानाच कोमेजू लागले आहेत. आता शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. मका आणि सोयाबीनचीही अशीच परिस्थिती असल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. 

कपाशीच्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणावर फूट पडली आहे. पाऊस नसल्याने अर्धेच बियाणे उगवून आले. शेतकऱ्यांना तूट लागवडही करता येत नसल्याचे देविदास घोडके यांनी सांगितले. कपाशीची तूट लागवड केली तर पाऊस नसल्याने खार व पक्ष्यांकडून बियाणे उकरून खाल्ले जातात. यामुळे त्याचाही आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसतो. सद्यःस्थितीत सोयाबीन आणि कपाशीच्या पिकाला पावसाची नितांत गरज असल्याचे विष्णू जोशी यांनी सांगितले. पाऊस आला नाही तर कपाशी व सोयाबीनचे पीक वाया जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. 

लागवड केलेले कपाशीचे पीक कोमेजू लागल्याने महागडे बियाणे वाया गेले आहे. यामुळे शासनाने शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी बियाणे उपलब्ध करून द्यावे. 
- शिवहरी वाघ, शेतकरी

कपाशी आणि मक्याचे अंकुर उन्हामुळे कोमेजून चालले आहेत. मृग नक्षत्रातील जोरदार पावसामुळे आम्ही वेगाने लागवड केली परंतु त्यानंतर पाऊसच आला नसल्याने दुबार पेरणीचे संकट अटळ आहे. 
- सतीश मगर, शेतकरी 

ठिबकवर लागवड केलेल्या शेतकऱ्यांना कपाशीला पाणी देता येत असले तरी वरून ऊन आणि जमिनीत गारवा यामुळे बियाणे उकडले जात आहे. त्यामुळे बियाण्याची उगवण क्षमता कमी झाली आहे. कपाशी आणि सोयाबीनच्या उगवण क्षमतेसाठी पावसाची गरज आहे. 
- सांडू उखर्डे, शेतकरी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT