gogegaw photo 
मराठवाडा

शेतकऱ्यांनी अख्खे कुटुंबच जुंपले हळद काढणीला

रमेश सांगळे

गोजेगाव(जि. हिंगोली): औंढा तालुक्‍यातील गोजेगाव शिवारात सध्या हळद काढणीस सुरवात झाली आहे. कामासाठी शेतमजूर मिळत नसल्याने शेतकरी एकमेकांना सहकार्य करीत असून अख्खे कुटुंबच कामाला जुंपले जात आहे. यासाठी शेतात सोशल डिस्‍टन्स पाळला जात आहे. मात्र, वातावरणाच्या बदलामुळे हळदीच्या उत्पादनात घट होत आहे. त्यामुळे लागवडीसाठी केलेला खर्चही निघत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.

औंढा नागनाथ तालुक्‍यातील गोजेगाव येथे या वर्षी हळदीची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली आहे. सध्या हळद काढणीस आली आहे. मात्र, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र संचारबंदी व जमावबंदी सुरू आहे. यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. याचा परिणाम शेती कामावरही झाला असून शेतातील कामासाठीदेखील मजूर येत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

कुटुंबीयांसह शेतकरी शेतात 

हळद काढणीला मजूर येत नसल्याने शेतकरी एकमेंकांच्या शेतात काम करत आहेत. हळद उत्पादक शेतकरी सर्व कुटुंबीयांसह शेतात राबत आहेत. एकमेंकांना सहकार्य करत असताना हळद काढताना सोशल डिस्टन्स पाळला जात आहे. दोन सदस्यांमध्ये अंतर ठेवून शेतातील कामे केली जात आहेत. दरम्यान, या वर्षी वातावरणाचा परिणाम हळदीच्या पिकावर झाला आहे. दर वर्षी एकरी पंधरा ते अठरा क्‍विंटल निघणारी हळद या वर्षी बारा क्‍विंटलपर्यंत आली आहे. 

हळदीला चार ते पाच हजार रुपये भाव 

हळदीसाठी एकरी बियाणे खरेदीसाठी २० हजार रुपये खर्च आला. खत १५ हजार, बेड तयार करणे १५०० रुपये, निंदणी पाच हजार, हळद काढणीसाठी आठ हजार, ट्रॅक्‍टरसाठी दोन हजार, कूकरमध्ये शिजविणे तीन हजार रुपये, असा एकरी ५० ते ५५ हजारांचा खर्च लागवडीसाठी आल्याचे निवासराव सांगळे यांनी सांगितले. बाजारात हळदीला चार ते पाच हजार रुपये भाव मिळत आहे. खर्च व उत्पादन याचा विचार केल्यास हातात काहीच पडत नसून केलेली मेहनत वेगळीच असल्याचे शेतकरी सांगत आहेत. काही शेतकरी सांगड करून हळदी काढणी करीत असल्याने त्‍याचा थोडाफार खर्च कमी होत आहे.


एकरमध्ये अठरा क्‍विंटल हळद

 मागच्या वर्षी एका एकरमध्ये अठरा क्‍विंटल हळद निघाली होती. या वर्षी वातावरणात होणाऱ्या बदलाचा परिणाम हळद उत्पादनावर झाला आहे. त्यामुळे एकरी बारा क्विंटलचा उतार येत आहे. बाजारात भावदेखील कमी झाले आहेत. हळदी लावडीचा खर्च व उत्‍पादन याचा विचार केल्यास हातात काहीच पडले नाही.
-आनंदराव सांगळे, हळद उत्‍पादक
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari : विमान अपघातावर मिटकरींचे गंभीर प्रश्न; सहा मृतदेहांपैकी एकाचा ठावठिकाणा अद्याप अज्ञात

Railway recruitment: रेल्वेमध्ये तब्बल २० हजारांहून अधिक 'ग्रुप डी' पदांसाठी भरती सुरू ; इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवारही करू शकतात अर्ज

Pune Water News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ८ ते १० दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होणार; पाणीटंचाईची भीती

Sangli Hit And Run : गणपती पेठेत ‘हिट अँड रन’चा थरार, चार पोलिसांसह अकरा जखमी; नशेतधुंद कार चालकास जमावाने तुडवले

Rohit Shetty House Firing Case : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबारप्रकरणी पुण्यातून पाचजण ताब्यात, गॅंगस्टर बिश्नोई टोळीशी संबंधाचा संशय

SCROLL FOR NEXT