परभणी : परभणी जिल्ह्यात कापूस विक्रीसाठी शासनाने नोंदणी सुरू केली आहे. मंगळवारपासून नोंदणी सुरू झाली असून आतापर्यंत ३२ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केल्याने अजूनही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापूस शिल्लक असल्याचे समोर येत आहे.
लकडाउन झाल्यानंतर कापसासह सर्व शेतमालाची खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प झाले होते. तब्बल महिनाभरापासून खरेदी नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. कापूस पणन महासंघ, भारतीय कापूस निगम यांनी हमीभावाने फेब्रुवारी महिन्यात खरेदी सुरू केली होती. खरेदी केंद्रावर वाहनांच्या रांगा लागत होत्या. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन झाल्याने कापसाची अवक दररोज वाढत असल्याने खरेदीला वेळ लागत होता. उशिरा झालेल्या पावसामुळे उत्पादनदेखील मार्चअखेरपर्यंत सुरू राहिले.
हेही वाचा व पहा - Video : भरधाव वेगाने आले अन् झाले क्वारंटाइन !
३२ हजार ८४९ शेतकऱ्यांनी नोंदणी
अनेक शेतकऱ्यांनी भाववाढ होईल या आशेने कापूस घरात ठेवला होता, तर खरेदी केंद्रावर गर्दी असल्याने बहुतांष शेतकऱ्यांनी गर्दी कमी होण्याची वाट पाहिली होती. मात्र, लॉकडाउनमुळे खरेदी बंद झाल्याने ज्यांच्या कापूस शिल्लक राहिला त्या शेतकऱ्यांची अडचण झाली. आर्थिक बाबीसाठी आणि कापूस घरात सांभाळणे धोक्याचे असल्याने कापसाची खरेदी सुरू करण्याची मागणी झाल्याने शाससाने ता.२० पासून खरेदी सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आधी नोंदणी, मग खरेदी, अशी अट घातली. त्यानुसार शासनाने लिंक देत त्यावर शेतकरी, त्यांचे नाव, पत्ता, कापसाचे छायाचित्र अशी माहिती संकलित करण्यास सुरवात केली आहे. खरेदी केंद्रावर गर्दी टाळण्यासाठी शेतकऱ्यांना थेट संदेश देत बोलावले जाणार आहे. मंगळवारपासून नोंदणी सुरू झाली आहे. गुरुवार (ता. २३) पर्यंत जिल्ह्यात ३२ हजार ८४९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.
हेही वाचा - गोड टरबुजाची कडू कहाणी : अपेक्षित दहा लाख; मिळाले केवळ दीड लाख
तालुकानिहाय नोंदणी
गंगाखेड ५,९९९, जिंतूर १,७७६, परभणी ४,८०६, पाथरी ३,८१४, पालम ३,९४३, पूर्णा ५०८, मानवत ५,१६६, सेलू ३,९९३, सोनपेठ २, ८४४, एकूण ३२ हजार ८४९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली.
शिल्लक कापूस खरेदी होणार
कापूस खरेदी सुरू झाल्यानंतर बाजार समिती संबंधित शेतकऱ्यांना क्रमाने संदेशासह दूरध्वनीद्वारे बोलावणार आहेत. त्यानंतरच शेतकऱ्यांनी कापूस घेऊन यावे. शिल्लक असलेला सर्व कापूस खरेदी होणार आहे.
- मंगेश सुरवसे, जिल्हा उपनिबंधक परभणी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.