मंठा : मळणी यंत्रातून धान्य तयार करताना शेतमजूर.  
मराठवाडा

कोरोनाबरोबरच शेतकऱ्यांना पावसाची धास्ती 

कृष्णा भावसार

मंठा (जि.जालना) - कोरोना विषाणूच्या धास्तीने जगातील सर्व कामधंदे, व्यवहार ठप्प झाले आहेत; परंतु शेतकऱ्यांचे शेतीकाम मात्र सतत रात्रंदिवस सुरूच आहे. शाळू ज्वारी, गहू, हरभरा या हातातोंडाशी आलेल्या पिकाचे बेमोसमी पावसाने नुकसान होऊ नये म्हणून शेतमजुरांबरोबर स्वतः राबताना दिसत आहे. 

शेतमजूर मिळत नसल्याने रब्बी पिकाच्या काढणीचे काम लांबणीवर पडले होते. सध्या कोरोना विषाणूच्या धास्तीने शहरात संचारबंदी आहे. त्यामुळे शहरात कामासाठी जाणारे मजूर गावातच थांबले आहेत. तसेच काही मजूर घरी बसून राहण्यापेक्षा शेतमजुरी करीत असल्याने रब्बीच्या पीक काढणी कामास वेग आला आहे. 

तालुक्यात सात-आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण, वादळी वारे तसेच काही ठिकाणी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या काढणी केलेल्या पिकाचे नुकसान झाले आहे. ज्वारी, गहू या पिकाची सोंगणी केल्यानंतर ते लगेच एका ठिकाणी जमा करता येत नाही.

सोंगणी केल्यानंतर पेंढ्या बांधणे. बांधलेल्या पेंढ्या एका ठिकाणी जमा करणे. कणीस खुडणे व त्यानंतर मळणीयंत्रातून धान्य तयार करणे अशी कामे होतात. या कामासाठी भरपूर वेळ लागतो. तालुक्यात जोरदार पाऊस पडला नसला तरी पडलेल्या बेमोसमी पावसाने तयार होत असलेल्या धान्याची व कडब्याची प्रत खराब होत आहे. शेतकऱ्यांना सतत कोणत्या ना कोणत्या संकटाचा सामना करावा लागत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT