Aurangabad News
Aurangabad News  
मराठवाडा

वाहनांना फास्टटॅग अनिवार्य ; काय आहे हे प्रकरण

अनिल जमधडे

औरंगाबाद  : देशभरात राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्‍यावर चारचाकी वाहनांना फास्टटॅग अनिवार्य करण्यात आला आहे. फास्टटॅग नसेल तर दुप्पट टोल द्यावा लागणार आहे. मात्र या बाबत पुरेशी जनजागृती नसल्याने वाहनधारकांनामध्ये अद्यापही संभ्रम कायम आहे. 

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने 1 डिसेंबरपासून राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या टोल नाक्‍यांवर दुचाकी सोडून सर्व गाड्यांना फास्टॅग अनिवार्य करण्यात आले आहे. फास्ट टॅग नसलेल्या वाहनांना दुप्पट टोल भरावा लागणार आहे. इंधन मानके आणि सुरक्षित वाहन मालकी इत्यादी कलमांच्या पालनासाठी फास्टटॅग आवश्‍यक असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र अद्यापही याबाबत संभ्रम कायम आहे. 

फास्टटॅग कुणासाठी? 

महामार्गावरुन वाहतूक करणाऱ्या प्रत्येक मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना त्याचप्रमाणे प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनांना फास्ट टॅग अनिवार्य करण्यात आला आहे. फास्ट टॅगमधून केवळ तीन चाकी वाहनांना मात्र वगळण्यात आलेले आहे. 

कसा असेल फास्टटॅग? 

फास्ट टॅग म्हणजे वाहनांवर लावण्यासाठीचे रिड होणारे स्टिकर असणार आहे. वाहनाच्या समोरच्या काचेवर लावलेला फास्टटॅग टोलनाक्‍यावरील सेंसर कॅमेरा रिड करेल. त्यानंतर वाहनधारकांच्या बॅंक खात्यातून टोलची रक्कम वजा होईल. यासाठी टोल नाक्‍यावर रांगेत उभे राहण्याची गरज राहणार नाही. त्याचप्रमाणे सुटे पैसे देण्याघेण्यासाठी वेळ घालवण्याचीही गरज राहणार नाही. टोल किती भरावा लागला हे समजण्यासाठी खातेदाराला त्वरीत मोबाईवर मॅजेस येईल. त्याचप्रमाणे ईमेलवरही त्याची माहिती मिळणार आहे. ही प्रक्रिया अवघ्या एका मिनिटाच्या पुर्वी होणार आहे. 

कसा मिळेल फास्टटॅग? 

फास्टटॅगसाठी जवळपास सर्वच राष्ट्रीयकृत बॅंकांनी आणि एचडीएफसी, आयसीआयसीआय यासह अन्य बॅंकांनी फ्रेन्चॉयजी घेतलेली आहे. बॅंकेत कारसारख्या वाहनांच्या खातेदाराला पाचशे ते सातशे रुपये आकारणी केली जाईल. त्यामध्ये 200 रुपये डिपॉजीट, 200 रुपयांचा रिचार्ज आणि शंभर रुपये ऍक्‍टीव्हेशन चार्जेस राहणार आहेत. काही बॅंकांमध्ये सेवेच्या ही रक्कम कमी जास्त असू शकते. बॅंकेकडून फास्टटॅग वाहनधारकाला घरपोच मिळणार आहे. विविध बॅंक यावर विविध सवलतील अपघात विमा अशा काही सुविधाही देत आहेत. 

सुरवात आधीच 

औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आरटीओ कार्यालयाकडे फिटनेस तपासणीसाठी येणाऱ्या प्रवाशी वाहतुकीच्या आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना फास्ट टॅग असल्याशिवाय फिटनेस प्रमाणपत्र दिले जात नाही. त्यामुळे ही अंमलबजावणी सहा महिन्यापासून सुरु झाली आहे. या शिवाय नविन खरेदी केलेल्या वाहनांना वाहनाच्या डिलरमार्फतच फास्टटॅग लावून वाहन दिले जात आहे. 

आरटीओ कार्यालयाने फास्टटॅग पूर्वीच अनिवार्य केले आहे. प्रवाशी वाहतूक व मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना फास्ट टॅग असल्याशिवाय योग्यता प्रमाणपत्र दिल्या जात नाही. यातून केवळ तीनचाकी वाहनांना वगळण्यात आले आहे.
- स्वप्नील माने, सहाय्यक प्रादेशिक परिवहन कार्यालय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला उडणार सोने खरेदीला झुंबड, पण सोनं खरं की भेसळयुक्त असं करा चेक!

Lok Sabha Election : नाशिकमधून मोठी बातमी! शांतिगिरी महाराजांचा अर्ज बाद

Adhyayan Suman : बेरोजगारी आणि आलेलं नैराश्य; हिरामंडीतील अभिनेता म्हणाला,"व्यसनाच्या आहारी जाणार होतो पण..."

SCROLL FOR NEXT