Beed News esakal
मराठवाडा

Beed News : डोळ्यांदेखत १५ एकर ऊस जळून खाक, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

आग आटोक्यात आणण्यासाठी गावकऱ्यांनी धाव घेतली पण...

प्रवीण फुटके

परळी वैजनाथ (जि.बीड) : तालुक्यातील बोधेगाव येथील शेतात उभ्या असलेल्या उसाला अचानक आग लागली. या आगीत जवळपास पाच ते सहा शेतकऱ्यांचा पंधरा एकर ऊस जळून खाक झाला. या आगीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. बोधेगाव येथे शुक्रवारी (ता.२१) दुपारी सोनहिवरा (Parli Vaijanath) रस्त्यावर तळ्याच्या लगत असलेल्या उसाला अचानक आग लागली. आग एवढ्या मोठ्या प्रमाणावर पसरली की, या आगीत जवळपास १५ एकर ऊस जाळून खाक झाला आहे. आगीमुळे शेतकऱ्यांचे (Farmer) लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या परिसरातील शेतात लागोपाठ शेजारी ऊस लागवड असल्याने एका शेतातील ऊसाला आग लागल्याने ती मोठ्या प्रमाणात पसरली. (Fifteen Acre Sugarcane Burned In Parli Vaijnath Taluka Of Beed)

यामध्ये बबलू राजेभाऊ शिंदे, सुधाकर रामभाऊ शिंदे, दशरथ नारायण शिंदे, बाळासाहेब नारायण शिंदे, मुंजाभाऊ गुणाजी गडदे आदी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आग लागताच गावकऱ्यांनी ती आटोक्यात आणण्यासाठी धाव घेतली. मात्र आग मोठ्या प्रमाणात पसरल्याने (Beed) शेतकऱ्यांना विझवणे अशक्य झाले होते. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य माऊली गडदे यांनी तात्काळ अग्निशमन दलाला संपर्क साधून माहिती दिली. मात्र शहरातून अग्निशमन दलाच्या गाड्या येईपर्यंत आग पसरली होती. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Traffic: घोडबंदर मार्ग 6 तास पाण्याखाली, चालकांचा वाहतूक कोंडीसोबत सामना; ठाणेकरांचे हाल

Latest Marathi News Live Updates: अमळनेरात पुराचा कहर; एकाचा मृत्यू, २४ तासांनंतरही शोध निष्फळ

प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरण! संशयित आरोपी मनीषा मुसळे माने यांचा दोषमुक्त करण्याचा न्यायालयाकडे अर्ज, अर्जात नेमके काय? वाचा...

Mumbai News: मुंबईत घर घेणं महागलं! नागरिकांच्या खिशाला फटका, 'इतक्या' टक्क्यांनी किमतीत वाढ, अहवाल समोर

सोहम बांदेकर अडकणार लग्नबंधनात! 'ही' मराठी अभिनेत्री होणार आदेश अन् सुचित्रा बांदेकरांची सून?

SCROLL FOR NEXT