file photo 
मराठवाडा

पन्नास हजार कर्जखाते आधारविना 

सकाळ वृत्तसेवा

नांदेड ः शासनाच्या महात्मा जोतिराव फुले कृषी कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्यातील एक लाख ७९ हजार ६२४ शेतकरी पात्र ठरले आहेत. यातील ४९ हजार ५०६ खाते आधारशी संलग्न नाहीत. या कर्जखात्यांना आधारशी संलग्न करण्यासाठी जिल्ह्यात गावस्तरावर मंगळवारी (ता. १४) व बुधवारी (ता. १५) ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहायकांच्या उपस्थितीत कॅम्प घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहेत.

१४ जानेवारीपर्यंत संलग्न करण्याचे निर्देश

महात्मा जोतिराव फुले कृषी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासनाने मार्गदर्शक कार्यपद्धती (एसओपी) निर्गमित केली आहे. यास कार्यपद्धतीनुसार ज्या शेतकऱ्याचा आधार क्रमांक बॅंकेच्या कर्जखात्याशी संलग्न नाही, अशा शेतकऱ्यांचा आधार क्रमांक कर्ज खात्याशी ता. १४ जानेवारीपर्यंत संलग्न करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यात शासनाच्या नवीन कर्जमुक्ती योजनेत अंदाजे एक लाख ७९ हजार ६२४ शेतकरी पात्र ठरले आहेत. यातील एक लाख तीस हजार ११५ कर्जखाते आधारशी संलग्न आहेत, तर ४९ हजार ५०६ खाते आधारशी संलग्न नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

गावस्तरावर मंगळवारी व बुधवारी कॅम्प

या कर्जखात्यांना आधारशी संलग्न करण्यासाठी जिल्ह्यात गावस्तरावर मंगळवारी (ता. १४) व बुधवारी (ता. १५) ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहायकांच्या उपस्थितीत कॅम्प घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) प्रवीण फडणीस यांनी दिली. या कॅम्पमध्ये ता. सात जानेवारी रोजी बॅंकांनी आधार संलग्न नसलेल्या कर्जखातेदार शेतकऱ्यांच्या आधारकार्डची स्वंसाक्षांकीत छायाप्रत घेऊन त्यावर कर्जखाते क्रमांक व उपलब्ध असल्यास मोबाईल क्रमांक नमूद करावा. अशा आधारकार्डच्या छायाकीत प्रती त्याच दिवशी संबंधित बॅंकेच्या शाखाधिकाऱ्यांकडे देण्याबाबत कॅम्पमध्ये शेतकऱ्यांना सूचना देण्यात येणार आहेत.

आधारशी संलग्नित बॅंक खात्याशी संबंधित योजना
शासनाची महात्मा जोतिराव कृषी कर्जमुक्ती योजना संपूर्णत: आधार क्रमांक जोडलेल्या बॅंक खात्याशी संबंधित असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे बॅंक कर्जखाते आधारशी जोडले नाहीत, अशा शेतकऱ्यांनी कॅम्पच्या दोन दिवसांत उपस्थित राहून अधिकाऱ्यांकडे आधारकार्डच्या छायांकीत प्रतीवर कर्जखाते क्रमांक व मोबाईल क्रमांक नमूद करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था प्रवीण फडणीस यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I: धक्कादायक! विश्वविजेता भारत हरला; आयर्लंडने करेक्ट कार्यक्रम केला, श्रेयसच्या नेतृत्वाची खराब सुरुवात; नेमकं काय घडलं?

भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटलं अन्... पिकअप व्हॅन दरीत कोसळली, ६ जणांचा जागीच मृत्यू

Latest Marathi News Live Update: भारत हा महिलांच्या सन्मानाचा पुरस्कार करणारा देश आहे - कदम

ऐकावं ते नवलंच! ब्रिटनच्या राजालाही भरावा लागतोय कर, ३७३ कोटींच्या टॅक्समागची नेमकी भानगड काय?

Karad Bus Stand Robbery: कऱ्हाड बसस्थानकातील जबरी चोरी उघडकीस; पती-पत्नी अटक

SCROLL FOR NEXT