file photo
file photo 
मराठवाडा

लाचखोर दलालाविरूद्ध गुन्हा दाखल

प्रल्हाद कांबळे

नांदेड : राष्‍ट्रीय महामार्गात गेलेल्या शेतीचा मावेजा मिळवून देतो म्हणणाऱ्या एका खासगी व्यक्तीविरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वजिराबाद पोलिस ठाण्यात रविवारी (ता. आठ) गुन्हा दाखल केला आहे. 

तक्रारदाराच्या पत्नीच्या नावे असलेली शेती शासनाने राष्ट्रीय महामार्ग ३६१ मध्ये गेली होती. या महामार्गासाठी ही शेती अधिगृहीत करण्यात आल्याने त्या शेतीचा मावेजा म्हणून २१ लाख १४ हजार १९७ रुपये बाधीत झालेल्या शेतकऱ्याच्या पत्नीच्या नावे निश्‍चित झाली आहे. ही रक्कम तक्रारदार यांच्या खात्यात जमा करून देण्यासाठी भू- संपादन अधिकारी कार्यालय व भूमि अभिलेख कार्यालय नांदेड येथील अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून काम करून घेऊन आपल्या बँकेत वरील रक्कम जमा करुन देण्यासाठी एक लाखाची लाच किशोर शर्मा या दलालाने मागितली.
 
किशोर जगदीश शर्मा याच्याविरुद्ध गुन्हा

परंतु ही लाच देण्याची इच्छा नसलेल्या तक्रारदाराने नांदेड येथे येऊन लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात ता. तीन मार्च रोजी तक्रार दिली. एसीबी कार्यालयाने या लाचेच्या मागणीची पडताळणी केली. लाच मागितल्याचे पडताळणी सापळ्यात निष्पन्न झाले. त्यानंतर रविवारी (ता. आठ) वजिराबाद पोलिस ठाण्यात लाच मागणारा खासगी व्यक्ती किशोर जगदीश शर्मा (वय ४०) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. हा सापळा यशस्वी करण्यासाठी पोलिस उपाधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कपील शेळके यांनी आपल्या पथकासह परिश्रम घेतले. 

एकाला जबर मारहाण करुन लुटले 

नांदेड : मंगल कार्यालयात गाठून एकाला अंधारात नेऊन जबर मारहाण केली. या मारहाणीत त्याचे दोन दात पडले. मारेकऱ्यांनी तीन सोन्याच्या व एक चांदीची अंगठी, सोन्याची चैन आणि हातातील चांदीचे कडे जबरीने चोरुन नेले. ही घटना ता. चार मार्च रोजी घडली होती. मात्र उपचारानंतर शनिवारी (ता. सात) रात्री या प्रकरणात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नांदेड शहराच्या हडको परिसरात राहणारा शुभम दिलीप जोशी (वय २५) हा बुधवारी (ता. चार) मार्च रोजी सिडकोच्या गोविंद गार्डनमध्ये बसला होता. यावेळी हडको येथील राहूल निळकंठ, बंटी नवघरे आणि अमोल बोरकर हे तिथे आले. यांनी शुभम जोशी याला गोविंद गार्डनच्या मागे रात्री अकराच्या सुमारास नेले. तिथे नेल्यावर त्याला जुन्या वादातून जबर मारहाण केली. या मारहाणीत शुभम जोशी याचे दोन दात तुटले. तसेच त्याच्या अंगावरील सोन्याचे दागिणे जबरीने चोरून नेले. उपचार झाल्यानंतर शुभम जोशी याने नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन राहूल निळकंठ, बंंटी नवघरे आणि अमोल बोरकर या तिघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक आर. एम. घोळवे करत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मनोज जरांगे अन् पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर; कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ; नेमकं काय घडलं?

IPL 2024, GT vs RCB Live Score: शाहरुख खानचे दमदार अर्धशतक, गुजरातने पार केला 120 धावांचा टप्पा

Nashik News : 10 वर्षानंतर धुळ झटकली; म्हाडा प्रकरणातील प्रस्ताव तपासण्याच्या सूचना

Latest Marathi News Live Update : एमके स्टॅलिन यांच्या पत्नीकडून तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात प्रार्थना

Ulhasnagar Crime : मटका किंगच्या मुलावर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी जेरबंद ; इन्स्टाग्राम पोस्टमुळे अडकला जाळ्यात

SCROLL FOR NEXT