Bribe News 
मराठवाडा

संतापजनक : पीएसआयसह पोलिसांनी घेतली लाच, तितक्यात पोहोचले सापळा अधिकारी अन..

सकाळवृत्तसेवा

उस्मानाबाद : ५० हजार रुपयांची लाच घेताना वाशी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक, दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह एका अनोळखी वाहनचालकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे. लाच स्विकारुन मात्र सर्वजण शासकीय वाहनासह पसार झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

रविवारी रात्री उशिरा पीएसआयसह दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उस्मानाबाद पोलिस उपअधीक्षक कार्यालयाच्या पथकाने ही कारवाई केली आहे.वाशी पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक सम्राट माने, पोलिस उपनिरीक्षक योगेश खटाने, बाळासाहेब बिभीषण हाके व अनोळखी वाहन चालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांना ट्रॅकटरमधे मुरुमची वाहतूक करत असताना पोलिसांनी पकडले. दरम्यान तक्रारदार यांच्यावर कारवाई न करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी ५० हजार रूपयाची मागणी केली. तडजोडी अंती ४५ हजार रूपये मागणी करुन पहिला हफ्ता ३० हजार रुपये स्विकारल्यानंतर पीएसआयसह पोलिस कर्मचारी अन शासकीय वाहनचालक पसार झाले.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठीक्लिक करा

दरम्यान सापळा अधिकाऱ्यांनी थांबविण्याचा प्रयत्न केला असता, लाच स्विकारणारे पळून गेले. दरम्यान तपास अधिकाऱ्यांना दुखापत  झाली. लाच स्विकारणारे पीएसआय, दोन पोलिस कर्मचारी आणि शासकीय वाहन चालक हे शासकीय वाहनासह पसार झाल्याचे शेवटी समोर आले. अशी माहिती सापळा अधिकारी पोलिस निरिक्षक जी. एस. पाबळे यांनी दिली आहे.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT