cooler factory fire in parli 
मराठवाडा

परळीमध्ये कुलर उत्पादन कारखान्याला आग; लाखोंचं नुकसान

प्रविण फुटके

परळी वैजनाथ (जि.बीड) : शहरातील औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या साई कुलर या कारखान्यास बुधवारी (ता.२३) सायंकाळी अचानक आग लागली. त्यामध्ये लाखो रुपयांचे सामान व कुलर जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी ६ अग्नीशमन दलाचे जवान, कर्मचारी दोन तासांहून अधिक वेळापासून प्रयत्न करत होते. रात्री ७.३० पर्यंत आग आटोक्यात आली नव्हती.

शहरातील औद्योगिक वसाहतीत सोळंके बंधू यांचे साई कुलर उत्पादन करणारा कारखाना आहे. या कारखान्यास बुधवारी सायंकाळी ५.४० च्या सुमारास अचानक आग लागली. आगीचे लोट व धुरामुळे कारखान्यातील कामगारांना आग विझवता आली नाही. पाहता-पाहता आगीने रौद्र रूप धारण केले.

या कारखान्यात प्लास्टिक,लोखंडी कुलर बनवले जातात. सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने या काळात कुलर तयार करुन ते उन्हाळी हंगामात विकले जातात. दरम्यान आगीमुळे कारखान्यातील लाखों रुपयांचा कच्चा व इतर माल जळून खाक झाला आहे. आग विझवण्यासाठी नगर पालिकेच्या अग्नीशमन दलाच्या तीन गाड्या, औष्णिक विद्युत केंद्राची, वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, आंबेजोगाई नगरपरिषद, सोनपेठ नगरपालिकेच्या एक-एक अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत असून ही आग आटोक्यात आल्यानंतरच आग कशामुळे लागली याचे कारण समजणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

बघ्यांची गर्दी- 
येथील औद्योगिक वसाहतीमध्ये लागलेली आग पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. गर्दी आटोक्यात आणण्यासाठी दंगर नियंत्रण पथकास पाचारण करावे लागले. तसेच आग लागल्यानंतर नगरपालिकेचे अगनीशमन दल जवळपास पाऊण तासांनी घटनास्थळी दाखल झाले. या अगनीशमन दलामध्ये कर्मचारी कमी असल्याने युवकांनी मोठी मदत केली. यावेळी तहसीलदार श्री.शेजूळ, नगरपालिकेचे गटनेते वाल्मिक कराड, नगरसेवक चंदूलाल बियाणी, चेतन सौंदळे, जयपाल लाहोटी यांनी घटनास्थळी भेट दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarfaraz Khan ला उपांत्यपूर्व सामन्यापूर्वीच करावं लागलं हॉस्पिटलमध्ये दाखल, संघाला मोठा धक्का; नेमकं काय घडलं?

Viral Video : खरी संपत्ती हृदयात असते ! चिमुकलीने भिकाऱ्याला दिले १० रुपये पण पुढे असं काही घडलं... व्हिडिओने जिंकली लाखोंची मने

Best Recharge Plans : एअरटेल बघतच राहिले अन् मुकेश अंबानीच्या Jio ने मारली बाजी! 15 OTT सोबत Free मध्ये मिळतय Netflix, किंमत फक्त...

Maharashtra local politics news : सदाभाऊ खोतांनी जयंत पाटलांची गावरान भाषेत खिल्ली उडवली, जिल्हा परिषद राजकारण तापलं

Mumbai Metro 3: मेट्रो तिकिटांवरील नावांवरून वाद पेटला! महिनाभरात दुरुस्ती नाही तर आंदोलन; प्रशासनाला इशारा, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT