Omicron sakal
मराठवाडा

जालना : जिल्ह्यात अखेर ओमीक्रॉनचा पहिला रूग्ण आढळला

हा रूग्ण दुबई येथून आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी दिली आहे.

उमेश वाघमारे

जालना : जिल्ह्यात मागील बारा दिवसांपासून कोरोनाच्या रूग्ण (Corona Patient) संख्येत भर पडत आहे. त्यात रविवारी (ता.नऊ) जिल्ह्यात पहिला ओमिक्रॉनचा रूग्ण आढळून आला. हा रूग्ण दुबई येथून आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी दिली आहे. (First Omicron Patient In Jalna District)

जिल्ह्यात ता.२८ डिसेंबर रोजी केवळ १६ सक्रिय कोरोना रूग्णांवर जिल्हा कोव्हिड रुग्णालय येथे उपचार सुरू होते. मात्र, मागील बारा ते तेरा दिवसांमध्ये प्रतिदिन कोरोना रूग्ण संख्येत भर पडत आहे. त्यामुळे रविवारी (ता.नऊ) जिल्ह्यात कोरोना सक्रिय रूग्णांची संख्या १३१ झाली होती. त्यात रविवारी जिल्ह्यात ओमीक्रॉनचा पहिला रूग्ण आढळून आला आहे. हा रूग्ण ता.एक जानेवारी रोजी दुबई येथून शहरात आला होता.

त्यांनतर ता.दोन जानेवारी रोजी या रूग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र, त्याला कोणताही त्रास नव्हता. सदर रूग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर खासगी रुग्णालयात दाखल होत असल्याचे आरोग्य यंत्रणेला सांगितले. मात्र, तो रूग्ण रूग्णालय दाखल न होता होम क्वारंटाईन झाला. दुबई येथून आल्याने व कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेने त्या रुग्णांचे नमुने ओमिक्रॉन विषाणू चाचणीसाठी पाठविले होते.

त्याचा अहवाल रविवारी (ता.नऊ) प्राप्त झाला असून त्या रुग्णाला ओमीक्रॉन विषाणूची लागण झाल्याचा अहवाल आला आला. त्यामुळे आता होम क्वारंटाईन असल्याने तो रूग्ण किती जणांच्या संपर्कात आला आहे, याची माहिती आरोग्य विभाग संकलित करत आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar oath ceremony : नितीशकुमार आज बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची दहाव्यांदा शपथ घेणार, मोदींची 'ग्रँड एन्ट्री' होणार!

Satara Politics: काहींना न्याय देऊ शकलो नाही: खासदार उदयनराजे भोसले; नाराज असलेल्याबाबत नेमकं काय म्हणाले?

अग्रलेख : पहिल्या घासाला खडा

Horoscope Prediction : आज धनयोग + सर्वार्थ सिद्धी योग! 'या' 5 राशींना होणार धनलाभ अन् भगवान विष्णू अनेक अडचणी दूर करणार!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 20 नोव्हेंबर 2025

SCROLL FOR NEXT