Corona
Corona 
मराठवाडा

जालन्यात पुन्हा पाचजण पॉझिटिव्ह, एकूण बाधित @१२२

महेश गायकवाड

जालना: जिल्ह्यातील पाच संशयीत रुग्णांचे अहवाल शुक्रवारी (ता.२९)रात्री पॉझिटिव्ह प्राप्त झाले. त्यामुळे आता एकूण बाधितांची संख्या १२२ झाली आहे. जिल्ह्यात गुरुवारी (ता.२८) दिवसभरात ३२ कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभागाला हादरा बसला होता.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

आरोग्य यंत्रणेने या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तीचा युद्धपातळीवर शोध घेऊन १७३ संशयितांचे नमुने तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठवले होते. शुक्रवारी रात्री त्यांचा अहवाल प्राप्त झाला. त्यापैकी पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.मधुकर राठोड यांनी दिली आहे. या पाच रुग्णामध्ये शहरातील साईनाथ नगर मधील एक, धावडा (ता.भोकरदन) येथील एक आणि घनसावंगी तालुक्यातील खापरदेव हिवरा येथील तीन व्यक्तींचा समावेश आहे.

जिल्ह्यातील एकुण बाधितांचा आकडा र १२२ झाला असून त्यापैकी ३३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. सध्या रुग्णालयात ८९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. वाढत्या रुग्णांबरोबर या रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. शुक्रवारी आठ रुग्ण बरे झाल्यानंतर शनिवारी पुन्हा दहा रुग्णांना सुटी देण्यात येणार असल्याची माहिती कोविड हॉस्पिटलमधील सूत्रांनी दिली आहे.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

औरंगाबादचाही आकडा वाढला एकूण बाधित @ १४८७
औरंगाबाद : शहरात गेल्या आठवडाभरापासून कोरोना बाधितांची संख्या मंदावली खरी, मात्र मागील दोन दिवसापासून पुन्हा रुग्ण संख्येत वाढ होऊ लागली आहे. शनिवारी (ता.३०) सकाळी २८ नवे रुग्ण वाढले असून आता एकूण बाधितांची संख्या १४८७ झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली.

सलग सहा दिवस कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर शुक्रवारी (ता.२९) ५२ कोरोनाबाधित रुग्णांना लागण झाल्याचे अहवालातुन स्पष्ट झाले. गुरुवारी (ता. २८) ४५ रुग्ण वाढले गेल्या दोन दिवसातच ९७ जण बाधीत आढळले. आज सकाळी २८ रुग्णांची वाढझाली झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या ‍१४८७ झाली आहे. यापैकी ९३७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून ६९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता ४८१ रुग्णांवर उपचार सुरू आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Latest Marathi News Live Update: पुण्यातील प्रचारसभास्थळी नरेंद्र मोदी दाखल

Loksabha election 2024 : ''जेव्हा माझी पंतप्रधान पदासाठी घोषणा झाली तेव्हा मी रायगडावर आलो अन्...'' मोदींनी साताऱ्यात सांगितली आठवण

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाता-दिल्ली थोड्याचवेळात येणार आमने-सामने; जाणून कोण ठरलंय आत्तापर्यंत वरचढ

SCROLL FOR NEXT