nandapur pdc bank 
मराठवाडा

सोशल डिस्टंन्स पाळत रंगला गप्पांचा फड...कुठे ते वाचा

राजेश दारव्हेकर

हिंगोली : नांदापूर (ता. कळमनुरी) येथील जिल्‍हा मध्यवर्ती बँकेत पंतप्रधान किसान योजना व पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाली आहे. ही रक्‍कम उचलण्यासाठी शेतकरी गर्दी करीत आहेत. गर्दी वाढत असल्याने बॅंकेने गोल रिंगन आखून सोशल डिस्टंन्सचे पालन करत अनुदान गावनिहाय वाटप सुरू केले आहे.

नांदापूर येथील जिल्‍हा मध्यवर्ती बँकेला परिसरातील सोळा गावे जोडली आहेत. यात नांदापूरसह, हारवाडी, आमदरी, सोडेगाव, जामगव्हाण, कंजारा, महेशगव्हाण, पूर, राजदरी, रुपूर, रेणापूर, सालेगाव, सावंगी, सोनवाडी, टाकळगव्हाण, टेंभूरदरा या गावांचा समावेश आहे. 

अबकड या प्रमाणे याद्या

सध्या बँकेत पीकविमा व पंतप्रधान किसान योजनेची रक्‍कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे. ती रक्‍कम घेण्यासाठी शेतकऱ्यांची बँकेत मोठी गर्दी होत आहे. यामुळे येथील बँक प्रशासनाने आता अबकड या प्रमाणे गावच्या याद्या तयार करून त्‍यांना वेळ व तारीख दिली असून त्‍याप्रमाणे लाभार्थींना अनुदानाचे वाटप केले जात आहे. 

बँक खात्यात रक्‍कम

दरम्यान, सोशल डिस्टन्सचे पालन करीत शेतकरी लाभार्थी बॅंकेने आखून दिलेल्या वर्तुळात उभे राहात आहेत. मात्र, रक्कम काढण्यात गर्दीमुळे वेळ लागत असल्याने आखलेल्या रिंगणात बसून गप्पा मारीत असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्‍कम आल्याची माहिती मिळाल्यावर शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. 

दोन ग्राहकांत एक मीटरचे अंतर

यासाठी शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करीत त्‍याचे वाटप सुरू केले. दोन ग्राहकांत एक मीटरचे अंतर ठेवून गोल रिंगन तयार केले आहेत. तसेच गर्दी होणार नाही यासाठी अबकड प्रमाणे यादी तयार करून गावनिहाय वाटप करणे सुरू केल्याने गर्दीवर नियंत्रण आल्याचे शाखाधिकारी गणेश बोरकर यांनी सांगितले.

दोन बँकांच्या शाखाधिकाऱ्यांना नोटीस

वसमत : नियमाचे उल्‍लंघन केल्याप्रकरणी गुरुवारी (ता. २३) तहसीलदार ज्‍योती पवार यांनी येथील जिल्‍हा मध्यवर्ती बँक व भारतीय स्टेट बॅंकेच्या शाखाधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे बँकांना सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यत अर्थिक व्यवहार चालू करण्याबाबत आदेशीत केले आहे. 

काटेकोर पालन होत नसल्याचे आढळले

परंतु, गुरुवारी दुपारी शहरातील विविध बॅंकांमध्ये तहसीलदार ज्योती पवार यांनी पाहणी केली असता काही ठिकाणी सूचनांचे काटेकोर पालन होत नसल्याचे आढळले. त्यामुळे अशा बॅंक अधिकाऱ्यांना सक्त सूचना देण्यात आल्या. तसेच जिल्‍हा मध्यवर्ती बॅंकेस भेट दिली असता बॅंकेमध्ये सामाजिक अंतर ठेवून बसण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने काही वयस्क महिला उन्हातच बसून होत्या.

बॅंक व्यवस्थापकास सूचना

 त्यामुळे तत्काळ बॅंक व्यवस्थापकास सूचना देऊन सावलीसाठी मंडप किंवा इतर उपाययोजना करण्याबाबत आदेशीत केले. तसेच जिल्हा बॅंकेच्या शाखाधिकारी व नांदेड रोडवरील भारतीय स्टेट बॅंकेच्या शाखेच्या शाखाधिकाऱ्यांनी नियमाचे पालन केले नसल्याने त्‍यांना नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार ज्‍योती पवार यांनी दिली.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe Election Commissioner : तुकाराम मुंढे निवडणूक आयुक्त होणार? मुंबईच्या आंदोलनात कोणी केली मागणी

Electric Vehicle Policy: सरकारी योजना! इलेक्ट्रिक वाहनांवर १५ लाख रुपयांपर्यंतची सवलत; काय आहे नवीन स्कीम?

Latest Marathi News Live Update : जेलमध्ये टाकलं तर… अभिजीत दिपके म्हणाले मी पुन्हा येईन

Dive Agar Incident : 'चेहऱ्याची त्वचा खराब होईल म्हणून पाण्यात गेलो नाही आणि वाचलो'; प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्याची व्यथा

Alandi News : विनर्स अकॅडमीवर नगरपरिषदेची कारवाई; इमारत सील

SCROLL FOR NEXT