Padamsinha Patil esakal
मराठवाडा

माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांना कोरोनाची लागण, मुलाने दिली माहिती

राज्याचे माजी गृहमंत्री डॉ.पद्मसिंह पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्याचे पुत्र आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनीदिली.

तानाजी जाधवर

उस्मानाबाद : राज्याचे माजी गृहमंत्री डॉ.पद्मसिंह पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्याचे पुत्र आमदार राणाजगजितसिंह पाटील (Ranajagjitsinha Patil) यांनी सोशल मीडियावरुन दिली आहे. डॉ.पाटील हे अगोदरच आजारी असल्याने त्यांच्या प्रकृतीबाबत कायम दक्षता घेतली जाते. त्यातच कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांकडुन चिंता व्यक्त करण्यात येत होते. मात्र राणा पाटील यांनी डॉ.पाटील यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती दिली आहे. कोरोना चाचणी (Corona Test) पॉझीटिव्ह वैद्यकीय सल्ल्यानुसार खबरदारीसाठी रुग्णालयामध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असल्याचे त्यानी सांगितले आहे. (Former Home Minister Padamsinh Patil Tested Corona Positive)

डॉ.पद्मसिंह पाटील (Padamsinha Patil) सध्या प्रकृती अस्वस्थ्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमापासुन दुर असतात. अगदी मोजक्याच कार्यक्रमांना त्यांची हजेरी पाहायला मिळते. २०१४ साली त्यांचा लोकसभेला (Osmanabad) पराभव झाल्यानंतर राजकीय जीवनापासुन ते अलिप्त झाले होते. एक प्रकारे त्यांनी राजकारणातुन निवृत्तीच घेतली होती. तब्येत हेच त्याचे महत्त्वाचे कारण सांगितले जात आहे. असे असले तरी निवडणुकाच्या काळात ते कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत असल्याचे पाहायला मिळाले होते. तसेच काही मोजक्या कार्यक्रमांना देखील त्यांची उपस्थिती असते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या संसर्गाचा विचार करता त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमाला येण्याचे काही प्रमाणात टाळल्याचे दिसुन येत आहे. कोरोनाची लागण झाली असली तरी प्रकृती उत्तम असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT