Subhash Wankhede esakal
मराठवाडा

Hingoli : काँग्रेसला धक्का; माजी खासदार सुभाष वानखेडे पुन्हा शिवसेनेत

संतोष बांगर यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्यानं जिल्ह्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडलं होतं.

सकाळ डिजिटल टीम

संतोष बांगर यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्यानं जिल्ह्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडलं होतं.

नांदेड : हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे (Hingoli Lok Sabha Constituency) शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात सामील झाले आहेत. त्यांच्या बंडखोरीनंतर जिल्ह्यात आता सर्वच पक्षांना विस्तारासाठी संधी निर्माण झालीय. त्यामुळं आता पक्षाचे नेते व स्थानिक पदाधिकारी काय भूमिका घेणार याकडं जिल्हावासीयांचं लक्ष लागलंय.

हिंगोली जिल्हा शिवसेनेचा (Hingoli Shiv Sena) बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळं हिंगोली लोकसभा मतदारसंघात बहुतांश वेळा शिवसेनेनं आपलं वर्चस्व सिद्ध केलंय. मात्र, विधानसभा मतदारसंघामध्ये कळमनुरीवर शिवसेनेची, वसमतवर राष्ट्रवादी तर हिंगोली विधानसभेवर भाजपची पकड आहे. त्यामुळं कुठल्याही पक्षाला मागील काळात जिह्यात विस्तार करता आला नाही. त्यातच आता शिवसेनेला एकीकडं बंडखोरीचं ग्रहण लागलेलं असताना आता यापूर्वी पक्षाला सोडून गेलेल्यांची घरवापसी देखील सुरू झालीय.

माजी खासदार आणि सध्या काॅंग्रेसमध्ये असलेले सुभाष वानखेडे (Subhash Wankhede) यांनी आज मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत (Shivsena) शिवसेनेत प्रवेश केला. झालं-गेलं विसरून ठाकरे यांनी वानखेडे यांना पुन्हा शिवसेनेचा भगवा दिला. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, कळमनुरीचे आमदार तथा जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्यानं जिल्ह्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडलं होतं. ही कमतरता भरून काढण्यासाठी तसेच पाटील, बांगर यांना टक्कर देऊ शकेल अशा नेत्याची शिवसेनेला गरज होती. वानखेडे यांच्या घरवापसीमुळं हे शक्य होऊ शकेल, असं बोललं जातंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२० लाखांचं पॅकेज, वर्क फ्रॉम; IT इंजिनिअरने आईला का संपवलं?

Pune Nashik Highway: पिंपळवंडीत तरुणाला मारहाण; कुकडी नदीच्या पुलावरून पडून २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Ujani Dam: “उजनी धरणात ११० टीएमसी पाणी, तरी भीमा नदी कोरडी! इंदापूरमध्ये पाणीटंचाईचे संकट”

माधुरी दीक्षितने डॉक्टर असलेल्या नेनेंसोबत लग्न का केलं? सोनाली बेंद्रेसमोर सांगितलं खरं कारण; म्हणाली- मी अशा माणसाशी लग्न केलंत जो...

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील वातावरण तापलं! इंडिया आघाडीच्या मोर्चाला सुरूवात, सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार याचिका

SCROLL FOR NEXT