नुतन वसाहत परिसरातील उड्डाणपुलावरील शुकशुकाट. 
मराठवाडा

जालना शहरातील चाळीस मार्ग बंद 

उमेश वाघमारे

जालना - शहरात लागू केलेल्या दहा दिवसांच्या लॉकडाउनदरम्यान पोलिस व नगरपालिका प्रशासनाने शहरातील तब्बल ४० मार्ग बंद केले आहेत, तर दुसरीकडे शहरात प्रवेश करणाऱ्या मार्गावरही पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. 

जालना शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दहा दिवसांचा लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. यादरम्यान केवळ वैद्यकीय सेवा शहरात सुरू ठेवण्यात आली आहे. इतर सर्व दुकाने बंद आहेत. नागरिकांनी विनाकारण शहरात फिरू नये म्हणून पोलिस व नगरपालिका प्रशासनाने शहरातील तब्बल ४० मार्ग बंद केले आहेत.

नगरपालिकेकडून ठिकठिकाणी बॅरिकेड्‍स लावण्यात आले आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना शहराला प्रदक्षिणा घालण्याची वेळ आली आहे. मात्र, शहरात अंतर्गत रस्ते बंद असल्याने विनाकारण फिरणाऱ्यांची संख्याही आटोक्यात आल्याचे चित्र आहे. शहरात प्रवेश करणाऱ्या मार्गावरही पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

जुना जालना व नवीन जालना शहराला जोडणारे सर्व पूल शहरात लॉकडाउन लागू होण्यापूर्वी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने बंद करण्यात आले होते. मात्र, हे पूल बंद केल्याने पोलिस प्रशासनासह रुग्णवाहिकेला जाण्या-येण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे शहरातील रामतीर्थ पुलाच्या बाजूला असलेला छोटा पूल व राजमहल चित्रपटगृह परिसरातील पूल पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे नवीन जालन्यातून जुना जालन्यात जाण्यासाठी आता हे दोन मार्ग आहेत. 

पोलिस प्रशासनाकडून मिळालेल्या सूचनेप्रमाणे शहरअंतर्गत मार्ग बंद करण्यात आले आहेत. शहरातील जवळपास ४० मार्गांवर बॅरिकेड्‍स लावून बंद करण्यात आले आहेत. 
- नितीन नार्वेकर, मुख्याधिकारी, नगरपालिका

(संपादन : संजय कुलकर्णी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA Hike: आठव्या वेतन आयोगात पुन्हा DA वाढणार? केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारावर काय होणार परिणाम?

IPL 2027 Cricket News: दिल्ली कॅपिटल्सने नव्या मुख्य प्रशिक्षकाची घोषणा केली! 'दादा' कर्णधाराच्या Video ने प्रतिस्पर्ध्यांची झोप उडवली

क्षुल्लक कारणावरून वाद, लाथाबुक्यांनी मारहाण करत बंदुकीचा धाक; शिवसेनेतील नेत्याच्या मुलाला ठार मारण्याची धमकी; ठाण्यात काय घडलं?

Marathi News Live Updates: काढणीआधीच चार एकर ऊस जळून खाक; विद्युत तारांमधून ठिणगी पडल्याने शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

Pune PMPML Security: सुरक्षेसाठी कोट्यवधींचा खर्च, तरी आगारांत सुरक्षारक्षकच नाहीत; पीएमपीएमएलचा धक्कादायक कारभार उघड

SCROLL FOR NEXT