crime 
मराठवाडा

तु युपीवरुन आलास, शेतात क्वारंटाईन हो म्हणताच झोपेत हल्ला, दोघांचा मृत्यू, तीन गंभीर

सिद्धनाथ माने

मदनसुरी (जि. लातूर): उत्तरप्रदेशमधून आलेल्या गावातील एका व्यक्तीला गावात न रहाता शेतात क्वारंटाईन राहण्याचा तंटामुक्तीचे अध्यक्ष व ग्रामस्थांनी दिलेला सल्ला पचला नाही. याचा राग मनात धरून त्याने नातेवाईकांच्या मदतीने सल्ला दिलेल्या व्यक्तीच्या घरावर जोरदार हल्ला चढवला. यात दोघांना चाकूने भोसकून ठार केले तर तिघांना गंभीर जखमी केले. बोळेगाव (ता. निलंगा) येथे रविवारी (ता. २४) पहाटे अडीच वाजता ही घटना घडली.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

पोलिसांनी तातडीने हालचाली करत या प्रकरणातील प्रमुख आरोपींसह चौघांना ताब्यात घेतले असून या घटनेने बोळगावात तणाव निर्माण झाला आहे. अपर पोलिस अधीक्षक हिम्मतराव जाधव यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी गावात तळ ठोकून आहेत.

पोलिसांनी सांगितले, की बोळेगाव येथील विद्यमान तात्याराव बरमदे याचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून तो शनिवारी (ता. २३) रात्री उत्तरप्रदेशातून ट्रक घेऊन आला. गावातील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व ग्रामस्थांनी विद्यमानला बोलावून `तू उत्तरप्रदेशमधून आला आहेस व कोरोनामुळे शेतात जाऊन रहा`, असा सल्ला दिला. हा सल्ला विद्यमान व त्याच्या नातेवाईकाला आवडला नाही. त्यांनी सल्ला देणाऱ्या शत्रुघ्न शहाजी पाटील (वय १९) यांना `तु जास्त शहाणपणा करू नकोस` म्हणून हुज्जत घातली व आम्ही विद्यमानला गावातच ठेवणार म्हणून निघून गेले.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

थोड्या वेळाने विद्यमान गावाशेजारील चांदोरी (ता. निलंगा) गावात बहिणीकडे जाऊन काही नातेवाईकांना घेऊन आला. त्यानंतर पहाटे अडीच वाजता विद्यमान, अविनाश दत्तू माने, गणेश दत्तू माने, दत्तू रावसाहेब माने (चौघे रा. बोळेगाव), भरत सोळंके, सचिन भरत सोळंके, नितीन भरत सोळंके व बिभीषण सोळंके (चौघे रा. चांदोरी) या आठ जणांनी मिळून शत्रुघ्न पाटील यांच्या घरावर दगडफेक सुरू केली. पाटील यांचे वडील शहाजी किसन पाटील (वय ५०) यांच्यावर चाकूने हल्ला केला.

यात ते जागीच ठार झाले. तर भरत सोळंके याने शत्रुघ्न पाटील यांचे चुलतभाऊ वैभव बालाजी पाटील यांच्या पोटात चाकूने वार केले. तेही जागीच ठार झाले. यानंतर सर्वांनी जणांनी मिळून शत्रुघ्न पाटील पाटील यांच्या भावास व चुलत भावांना जबर मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्वजण झोपेत असतानाच हल्ला झाल्याने पाटील कुटुंबिय गोंधळून गेले.

घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाला असून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रमुख आरोपी विद्यमान बरमदे याच्यासह पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक जाधव यांनी दिली. या प्रकरणी कासारसिरसी पोलिस ठाण्यात विद्यमानसह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.  

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Shubman Gill : शुभमन गिलची स्पर्धेतून माघार; ब्लड टेस्टनंतर फिजियोने BCCI ला पाठवला अहवाल अन्...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : विदर्भाचा अभिमान! नागपूरमध्ये मारबत उत्सवाला सुरुवात, काळ्या-पिवळ्या मारबतींच्या भेटीची उत्सुकता

SCROLL FOR NEXT