file photo 
मराठवाडा

चारशे दहा ग्रॅमचे शिवभोजन

कृष्णा जोमेगावकर

नांदेड : शिवसेनेच्या निवडणूक घोषणापत्रातील बहुचर्चित शिवभोजन योजनेची अंमलबजावणी येत्या (ता. २६) जानेवारीपासून शहरात चार ठिकाणी होत आहे. दुपारी बारा ते दोन या वेळात चारशे दहा ग्रॅम वजनाच्या थाळी लाभार्थींना देण्यात येणार आहेत. या वेळी त्यांचा फोटो व मोबाईल क्रमांक ॲपमध्ये घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

प्रायोगीक तत्वावर रोज पाचशे थाळ्या
राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन देण्याची घोषणा शिवसेनेने निवडणुकीपूर्वी केली होती. यानंतर सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारने ही योजना प्रायोगिक तत्वावर आगामी तीन महिन्यांसाठी राबविण्याचे ठरविले आहे. यासाठी नांदेड जिल्ह्यात पाचशे थाळ्या (जेवण) देण्यात येणार आहे. यासाठी नांदेड जिल्ह्यातील चार ठिकाणे निश्चित करण्यात आली. 

चार ठिकाणी मिळणार शिवभोजन
शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाजवळ, रेल्वेस्थानक (प्लॅटफार्म क्रंमाक चार, गोकूळनगर), शासकीय वैद्यकीय रुग्णालयासमोर (विष्णुपुरी) व नवीन मोंढा येथील एसबीआय बॅंकेसमोर असे चार भोजनालय सुरू करण्यात येणार आहेत. दुपारी बारा ते दोन या वेळात प्रत्येकी सव्वाशे थाळी लाभार्थींना या चार ठिकाणी देण्यात येणार आहेत. या वेळी त्यांचा फोटो व मोबाईल क्रमांक ॲपमध्ये घेण्यात येणार आहे. जेवणासाठी लाभार्थींना दहा रुपये मोजावे लागतील. प्रतिव्यक्ती चाळीस रुपये भोजनालयचालकास शासनाकडून मिळणार आहेत. प्रजासत्ताकदिनी (ता. २६ जानेवारी) पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्याच्या तयारीत प्रशासन आहे. या शिवभोजनाचा आस्वाद गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात असल्यामुळे या ठिकाणी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना ताव मारता येणार नाही.

जेवणात काय मिळणार? 
शिवभोजन थाळीत दोन चपाती (प्रत्येकी तीस ग्रॅम), एक वाटी भाजी (शंभर ग्रॅम), एक वाटी वरण (शंभर ग्रॅम) व एक वाटी भात (दीडशे ग्रॅम) असे एकूण चारशे दहा ग्रॅम वजनाचे जेवण गरजू नागरिकांना मिळणार आहे. हे जेवण एका वेळी एकदाच घ्यावे लागेल. जेवणाऱ्या लाभार्थींना जेवणाचे दहा रुपये द्यावे लागणार आहेत. तर भोजनालय चालकाला प्रतिथाळी चाळीस रुपये शासन देणार आहे. दरम्यान, शासनाची शिवभोजन योजना गरिबांसाठी चांगली आहे; पण गरजू लोकांची भूक चारशे दहा ग्रॅमच्या थाळीत कशी भागणार? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

स्वच्छतेकडे राहणार लक्ष 
भोजनालयात एका वेळी पंचवीस नागरिकांना जेवता येईल अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. या ठिकाणी स्वच्छतेला विशेष महत्त्व देण्याच्या सूचना दिल्या आहेत. स्टेनलेसस्टिलची भांडी वापरावी लागणार आहेत. तसेच या ठिकाणचे जेवण पार्सल करता येणार नसल्याचे शासकीय सूत्राने सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT