Beed Accident News esakal
मराठवाडा

Beed Accident News | बीडमध्ये मोठा अपघात, चार जण जागीच ठार

कार-रिक्षाची समोरासमोर धडक, नऊ जण गंभीर जखमी

रामदास साबळे

केज (जि.बीड) : इनोव्हा कार व रिक्षा या दोन वाहनांत केज-अंबाजोगाई रस्त्यावर समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना गुरुवारी (ता.२) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास होळ गावापासून एक किमी अंतरावर घडली. यात रिक्षा चालकासह चार जण जागीच ठार झाले, तर दोन्ही वाहनांतील नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर अंबाजोगाई (Ambajogai) येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांमध्ये दोन बालकांचा समावेश आहे. (Four People Died In Accident In Kaij Taluka Of Beed)

तालुक्यातील केज-अंबाजोगाई रस्त्यावर होळपासून एक किमी अंतरावर भरधाव वेगात निघालेल्या इनोव्हा कारने (एमएच १६ सीएन ७००) समोरून येणाऱ्या रिक्षाला (एमएच २३ एक्स ५२२) गुरूवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास धडक दिली. यात रिक्षाचा चेंदामेंदा झाला. रिक्षाही केजकडून (Kaij) अंबाजोगाईच्या दिशेने जात होती. तर कार अंबाजोगाईकडून केजच्या दिशेने येत होती. या अपघातात रिक्षा चालक बालाजी संपत्ती मुंडे (वय २८, रा.पिसेगाव, ता.केज), मच्छिंद्रसिंग चरणसिंग बोके (वय-३५, रा. भवानी माळ, धारूर रोड, केज), प्रिया दीपक सिंग (२ वर्ष) व युवराज सिंग (१ वर्ष) या चार जणांचा जागीच मृत्यू झाला.

जखमींमध्ये कारमधील मंदा चिखलकर, रिक्षातील आलम सिंग टाक, हरजित सिंग बादल व दीपक सिंग डोके यांच्यासह अन्य पाच जणांचा समावेश आहे. जखमींवर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालयात रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंजानक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. अपघाताची माहिती मिळताच मृतांच्या व जखमींच्या नातेवाईकांनी रूग्णालयात गर्दी केली होती. त्यांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले होते. (Beed Accident Updates)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठी घसरण! सर्वसामान्यांना दिलासा; पाहा आजचा ताजा भाव

किती क्युट! शशांक केतकरची लेक सेम टू सेम त्याच्यासारखीच, नाक, डोळे पाहून नेटकरी म्हणाले... Viral Video

Mumbai Doctor Case : 'तुझा पुरुषी अहंकार आता तरी..'; मुंबईतील डॉक्टर तरुणीने घेतला गळफास, 6 पानांच्या सुसाईड नोटमध्ये काय? स्तुतीसोबत असं का वागला प्रियकर फैजुल खान?

Jalgaon मुंबई-नागपूर महामार्गावर अर्टिगा कारने चौघांना उडवलं, दोन नंबर प्लेट अन् गाडीत पोलिसांच्या काठ्या

Kim Jong Un missile test : किम जोंग उन अमेरिका -इराण युद्धात उतरणार? क्षेपणास्त्रांच्या केल्या चाचण्या, किम जोंग यांची मुलगी उपस्थित

SCROLL FOR NEXT