संग्रहित छायाचित्र. 
मराठवाडा

दरोड्याच्या तयारीतील चौघांच्या मुसक्‍या आवळल्या 

उमेश वाघमारे

जालना -  शहरात कदीम जालना पोलिस ठाण्याच्या हद्दीत दरोड्याच्या तयारी असलेल्या चार संशयितांना पोलिसांनी शुक्रवारी (ता. तीन) अटक केली आहे. तर तीन संशयित अंधाराचा फायदा घेत पसार झाले आहेत. त्यांच्याकडून एक चोरीच्या गाडीसह दरोड्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, या संशयितांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग येथे बॅक ऑफ महाराष्ट्र फोडण्याचा प्रयत्न केला व नेवासा येथे दरोडे टाकल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. 

शहरातील मस्तगड परिसरातील एका शेतात सहा ते सात व्यक्‍ती घातक शस्त्रासह असल्याचे गस्तीवर असलेल्या पोलिसांना दिसून आले. मात्र, पोलिसांना पाहिल्यानंतर संशयितांनी पळ काढला. दरम्यान, पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले; मात्र तीन संशयित पोलिसांना गुंगारा देत फरारी झाले. यात संशयित किशोरसिंग ऊर्फ टकल्या रामसिंग टाक (वय 22, रा. गुरुगोविंदसिंगनगर, जालना), दियासिंग बरीहमसिंग कलानी (23, रा. हिंदनगर, नवीन मोंढा, जालना), गजानन सोपान शिंगाडे (30, रा. पाचनवडगाव, ता.जि. जालना) आणि अनिल गोरखनाथ वलेकर (25, रा. काजळा, ता. बदनापूर, जि. जालना) या चौघांना अटक करण्यात आली आहे. तर तेजासिंग नरसिंग बावरी, हरदीपसिंग बबलूसिंग टाक (दोघे रा. गुरुगोविंदसिंगनगर, जालना) व मनोहरसिंग ऊर्फ भुत्य प्रेमसिंग टाक (रा. जमुनानगर, जालना) हे तीन संशयित फरारी झाले आहेत.

दरम्यान, या संशयितांकडून जप्त केलेली जीप ही किनगावराजा (जि. बुलडाणा) पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ता. 27 डिसेंबर रोजी चोरलेली आहे; तसेच या संशयितांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत ता. दोन जानेवारी रोजी बॅंक ऑफ महाराष्ट्र बॅंकेवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. तर नेवासा येथील एक सराफा दुकानही फोडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, या टोळीकडून अजून बरेच गुन्हे उघड होण्याची शक्‍यता आहे. ही कारवाई एडीएसचे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव, कदीम जालना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देविदास शेळके यांच्यासह त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: १३ वर्षांच्या शाळकरी मुलीनं जिंकलं 'Gold'; भल्याभल्यांना जे नाही जमलं, ते करून दाखवलं

साठी गाठूनही सलमान खान फिट कसा? घरचं जेवण, वर्कआउट अन्... जाणून घ्या भाईजानचा फिटनेस फंडा

‘अपशब्द वापरण्यापेक्षा…’ शशांक केतकर ट्रोलर्सवर भडकला? उत्तर देत म्हणाला...आधी मी काय म्हणतोय ते...'

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

Miraj Government Hospital Slab Collapse : मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी दुर्घटना; नवीन कमानीचा स्लॅब कोसळला, 7 कामगार जखमी, एकाची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT