corona 
मराठवाडा

या’ शहरात २९ कॉलन्यातील चार हजार ८६ घरे कंटेंटमेंट झोनमध्ये

सकाळ वृत्तसेवा

परभणी ः ‘कोरोना’बाधित रुग्ण सापडल्याने शहरातील त्या परिसरासह इतर कॉलन्यांतील चार हजार ८६ घरे कंटेंटमेंट झोनमध्ये समाविष्ठ करण्यात आली आहेत. या झोनमधील नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडता येणार नाही, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता. १७) सांयकाळी दिल्या आहेत.

परभणी शहरात बाहेरजिल्ह्यातून आलेल्या एका रुग्णास कोरोना विषाणूचा संसर्ग बाधित निदान झाल्याचे ता.१६ एप्रिलला कोविड १९ तपासणीअंती समोर आले आहे. त्या अनुशंगाने कोविड - १९ या साथरोगाचा संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने परभणी शहरातील काही परिसर कंटेंटमेट झोनमध्ये समाविष्ठ केले आहेत. हा परिसर नागरिकांसाठी प्रतिबंधित परिसर म्हणून घोषित केला आहे.

झोनमध्ये या २९ कॉलन्या
दुर्गानगर, कपिलनगर, वृंदावन कॉलनी, सहारा कॉलनी, प्रबुद्धनगर, महात्मा फुलेनगर, प्रियदर्शनीनगर, अहिल्याबाई होळकरनगर, राजे संभाजीनगर, सुंदरीनगर, श्रेयसनगर, जिजाऊनगर, एमआयडीसी परिसर, कृषी सारथी कॉलनी, रामदासनगर, चतुरानगर, रचनानगर, सोमनाथनगर, राजेंद्र गिरीनगर, अंबाभवानीनगर, मथुरानगर, गोकुळनगर, गजानननगर, समाधान कॉलनी, साईबाबानगर, ए - वन मार्केट, भाग्यनगर, वैभवनगर, गाडगे बाबानगर या परिसरातील चार हजार ८६ घरांचा समावेश आहे.

अत्यावश्यक वस्तू पाहिजे असल्यास फोन करावा लागणार
कंटेंटमेंट झोनमध्ये समाविष्ठ करण्यात आलेल्या चार हजार ८६ घरांतील नागरिकांना काही अत्यावश्यक वस्तू व सेवा लागत असल्यास त्यांना महापालिकेने दिलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना फोनद्वारे किंवा व्हॉट्सॲपद्वारे मागणी करावी लागणार आहे. यासाठी विठ्ठल सोवणे (९४०५७६६६६४, ९५८८६५०६५१), विठ्ठल शेळके (९४२१७६४७१), विठ्ठल गिराम (९०४९२२३६४), दिगंबर जाधव (९३०९५५४२७३, ९८२३९६१६९१), जुबेर हाश्मी (९८९०६६४०५४), पांडुरंग रणेर (७५८८०१८४१८), सुनील भराडे (८३७९९५६३८७) यांच्या क्रमांकांवर संपर्क साधावा लागणार आहे. 

मास्क न लावल्यास थेट कारवाई
परभणी ः ‘कोरोना’ विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लॉकडाउन दरम्यान कडक निर्बंध सुरू केले आहेत. आता यापुढे सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास किंवा मास्क न वापरल्यास थेट कारवाई होणार आहे. पहिल्यांदा दोषी आढळल्यास दंडस्वरुपात आणि दुसऱ्यांदा आढळल्यास फौजदारी कारवाई केली जाणार आहे. सार्वजनिक रस्ते, बाजार, रुग्णालये, शासकीय कार्यालयांच्या ठिकाणी थुंकल्यास शंभर रुपये दंड आणि दुसऱ्यांदा आढळल्यास फौजदारी कार्यवाही केली जाणार आहे.तसेच सार्वजनिक स्थळी चेहऱ्यावर मास्क न वापरणे, नाक, तोंड सुरक्षितपणे झाकलेले नसणे या गुन्ह्यास शंभर रुपये दंड आणि दुसऱ्यांदा फौजदारी कार्यवाही, दुकानावर, भाजीपाला विक्रेते, सर्व जीवनावश्यक विक्रेते यांनी ग्राहकांमध्ये सामाजिक अंतर न पाळल्यास ग्राहकास शंभर रुपये आणि संबंधित विक्रेता, दुकानदारास पाचशे रुपये दंड, सार्वजनिक ठिकाणी, रस्ते, बाजार, रुग्णालये, कार्यालये अशा ठिकाणी एखादी व्यक्ती विनाकारण आढळून आल्यास दोनशे रुपये दंड, एखादी व्यक्ती दुचाकीवरून वैयक्तिक वापरासाठी भाजीपाला, किराना, औषधी घेऊन जात असल्याचे सांगून अनावश्यक फिरताना आढळुन आल्यास दोनशे रुपये दंड लागणार आहे. तसेच वरील सर्व गुन्हे दुसऱ्यांदा केल्यास फौजदारी कार्यवाही होणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी श्री.मुगळीकर यांनी काढले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Verdict : माधुरी हत्तीचं पुढं काय झालं? अनेकांना प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय

Nepal Crisis: नेपाळमधील हिंसाचारामुळे भारतीय कंपन्यांना फटका; डाबर- ब्रिटानियाचे उत्पादन ठप्प

Lonand Crime: 'लोणंदमध्ये दोन सराईत जेरबंद'; चार लाख सात हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत

‘रंगीला’पुन्हा पडद्यावर! उर्मिला-अमिरचा क्लासिक लव्हस्टोरी परत अनुभवता येणार, 'या' दिवशी रीरिलीज होणार सिनेमा

Guardian Minister Chandrakant Patil: महायुतीचा महापौर होण्यासाठी परिश्रम घ्यावेत: पालकमंत्री चंद्रकांत पाटील; आगामी काळात जबाबदाऱ्या मिळतील

SCROLL FOR NEXT