Fourteen lacs beef seized two arrested
Fourteen lacs beef seized two arrested 
मराठवाडा

चौदा लाखाचे गोमांस जप्त; दोघांना अटक

सकाळवृत्तसेवा

नांदेड: अकोल्याहून हैद्राबादकडे 14 लाखाचे सात हजार क्विंटल गोमांस घेऊन जाणारा ट्रक भोकर पोलिसांनी पकडला. यावेळी ट्रमधील दोघांना अटक केली असून त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई भोकर-म्हैसा रस्त्यावर रामदेव धाबा येथे शनिवारी (ता. एक) दुपारी चार वाजता केली.

राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू असतांना अकोला येथे गोवंशाची विनापरवानगी कत्तल करुन सात हजार क्विंटल गोमांस ट्रक (एम एच 06 ए.सी 6595) मध्ये भरुन हैद्राबादकडे जात होते. ही गुप्त माहिती भोकर पोलिस निरीक्षक रामा पडवळ यांना मिळाली. त्यांनी आपल्या ठाण्याचे फौजदार सुशिल चव्हाण यांच्या पथकाला सापळा लावण्यास सांगितले. यावेळी चव्हाण यांनी आपल्या हद्दीत गस्त घालत म्हैसा रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक वाहनावर लक्ष ठेवले.

शनिवारी दुपारी चारच्या सुमारास वरील क्रमांकाचा ट्रक दिसताच त्यांनी तो थांबविला. आत माल काय आहे हे विचारले असता चालक गोंधळुन गेला. पोलिसांनी महमद इरफान महमद इब्राहीम (वय 32) आणि अब्दुल जावेद अब्दुल सलीम (वय 25) दोघेही रा. जापली रोड खैर, अकोला यांना अटक केली. ट्रकमधील सात हजार गोमांस जप्त केले. 14 लाखाचे गोमांस व वीस लाखाच ट्रकसुध्दा गुन्ह्यात जप्त केला.

मानवी वसाहतीच्या बाहेर मोठा खड्डा करुन जप्त केलेले सात हजार क्विंटल गोमांस गाडून टाकून त्याची विल्हेवाट लावली. यासाठी फौजदार सुशिल चव्हाण, कर्मचारी उमेश कारामुंगे, शिवाजी पाटील, नामदेव जाधव आणि कृष्णा तलवारे यांनी परिश्रम घेतले. पथकाचे पोलिस अधिक्षक संजय जाधव यांनी कौतूक केले. या प्रकरणाचा तपास पोलिस नाईक दाढे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT