file photo 
मराठवाडा

गरजू कुटुंबांना मोफत धान्यांचे वाटप

राजाभाऊ नगरकर

जिंतूर (जि.परभणी) : संचारबंदीमुळे सर्वत्र कडकडीत बंद आहे. अशावेळी हातावर पोट असणाऱ्यांची उपासमार होऊ नये, या विचाराने गुलशन काॅलनीमधील नागरिकांनी गुरुवारी (ता.२६) इदगाह परिसरातील पन्नास गरजू कुटुंबांना आठ-दहा दिवस पुरेल एवढे धान्य व जीवनावश्यक वस्तूंची मोफत मदत करण्यात आली.
इदगह परिसरात बहुतांश गरिब मजूरदार राहतात. परंतु ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनातर्फे अंमलात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत गेले काहीं दिवसांपासून शहरात संचारबंदी असल्याने मजूरांच्या हाताला काम नसल्याने त्यांना घरीच बसून रहावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या मुलाबाळांवर उपासमारीची वेळ आली आहे. 


गुलशन काॅलनीमधील नागरिकांचा पुढाकार
अशावेळी या गरिबी कुटुंबांना मदत करण्याची गरज असल्याचे गुलशन काॅलनीमधील नागरिकांनी लक्षात घेऊन पत्रकार रियाज चाऊस यांच्या पुढाकाराने सय्यद नय्युम, सय्यद शाहरुख, फयाज चाऊस, शेख शारेक, हफेज मुहम्मद, सय्यद सलीम, शेख याहीया व इदगा परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने गव्हाचे पीठ, तांदूळ, साखर, चहा पावडर, डाळी, गोड तेल, सर्फ, साबण, लोणचे आदी साहित्य संकलित करून परिसरातील पन्नास कुटुंबांना ते वाटप करण्यात आले. तर, याप्रमाणेच दलित वस्तीमधील शेख तजमुल पटेल, शेख मुजम्मिल पटेल, शेख अब्दुल आहाद, शेख आरेफ, शेख निसार, शेख एजाज तांबोळी, शेख खदीर, राम कुरे, प्रकाश भिसे आदींनी या भागातील वेगवेगळ्या समाजातील सुमारे पन्नास गरिबांना धान्य  वितरित केले.

अन्नदान यज्ञाची सुरवात
परभणी : वीर सावरकर विचारमंच व म. शं. शिवणकर प्रतिष्ठान, परभणी यांच्या वतीने संचारबंदी दरम्यान, गरजूंना अन्नदान करण्याचा उपक्रम गुरुवारी (ता.२६) पासून हाती घेण्यात आला आहे.

हेही वाचा - दहा हजाराची लाख घेताना  परिक्षण भूमापकास अटक
‘कोरोना’ विषाणूमुळे जगात हाहाकार उडालेला आहे. तुम्ही-आम्ही सर्वजण घर नावाच्या स्वर्गामध्ये सुरक्षित आहोत. परंतु ज्यांचे आभाळ फाटलेले आहे आणि कसल्याही प्रकारचा त्यांना सहारा नाही अशा लोकांची काळजी घेण्यासाठी व अशा लोकांच्या पोटामध्ये प्रेमाचे चार घास घालण्यासाठी वीर सावरकर विचारमंच आणि म. शं. शिवणकर प्रतिष्ठानच्या वतीने अन्नदानयज्ञाची सुरुवात झालेली आहे. यामध्ये प्रामुख्याने अशा लोकांना अन्नदान करण्यात येत ज्यांना घर नाही. जे अनाथ आहेत. आणि ज्यांची कुठल्याही प्रकारची सोय नाही. गुरुवारी तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्या हस्ते या अन्नदान यज्ञाची पहिली आहूती पडलेली आहे. 

बस, रेल्वेस्थानकावर अन्नदान
परभणी बसस्थानक, रोकडा हनुमान मंदिर आणि रेल्वे स्टेशनच्या परिसरातील अनाथ लोकांना अन्न वाटप करण्यात आले आहे. यामध्ये सहभागी असणारे वीर सावरकर विचारमंचाचे सर्व सदस्य आणि त्याचबरोबर म. शं. शिवणकर प्रतिष्ठानचे सर्व सदस्य उपस्थित होते. यामध्ये डॉ. सचिन पाठक , रमेशराव गोळेगावकर, नगरसेवक मधुकर गव्हाणे, अभय चाटे, संजय रिजवानी, प्रवीण भानेगावकर, अन्न व्यवस्थापक सचिन सरदेशपांडे, रविकिरण गंभीरे, विजय अग्रवाल यांचा समावेश होता.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Protest : नेपाळमध्ये आंदोलनाचा भडका! पंतप्रधान ओलींचा राजीनामा; तरुणाांनी अर्थमंत्र्यांना पळवून पळवून मारलं...

Islampur Crime: 'बेकायदेशीर जमाव जमवून इस्लामपुरात दोन गटांत हाणामारी'; पूर्वी झालेल्या वादाच कारण, पाेलिस ठाण्यात गुन्हे दाखल

Latest Marathi News Updates: राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूरात राज्यस्तरीय एकदिवसीय चिंतन शिबिराचे आयोजन

Ayush Komkar News: नातवाची हत्या, आजोबासह मावशी आणि भावंडं अटकेत | Vanraj Andekar | Bandu Andekar | Sakal News

Sangli Crime: 'शेगावमध्ये घरफोडीत ४ लाखांचे सोने पळविले'; जत पोलिसांत गुन्हा, शोधासाठी पथक रवाना

SCROLL FOR NEXT