नायगाव (ता. कळंब) : कर्जमाफीच्या यादीत नाव असल्याची खात्री करताना शेतकरी.
नायगाव (ता. कळंब) : कर्जमाफीच्या यादीत नाव असल्याची खात्री करताना शेतकरी. 
मराठवाडा

लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरवात

तानाजी जाधवर

उस्मानाबाद : महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेतंर्गत अवघ्या काही दिवसांत दोन याद्या प्रसिद्ध जाहीर झाल्या असून, प्रत्यक्षात खात्यावर पैसे जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू झाली आहे. सोमवारपासून (ता. दोन) या कामाला गती मिळाली असून, आधार प्रमाणीकरण केल्यानंतर राष्ट्रीयीकृत बँकेतील लाभार्थ्यांच्या खात्यात २४ तासापर्यंत, तर सहकारी बँकामध्ये साधारण ७२ तासांच्या आत ही रक्कम खात्यावर जमा होणार असल्याची माहिती सहकार विभागाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, याद्यामध्ये नाव आले तरी रक्कम जमा होत नसल्याने शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण होत असल्याचे चित्र आहे. मात्र बँक खात्याची पडताळणी केल्याशिवाय कर्जमाफ़ीची रक्कम खात्यामध्ये जमा होणार नसल्याचे सहकार विभागाने स्पष्ट केले आहे. 
महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी २१ फ़ेब्रुवारीला प्रसिद्ध झाली होती. पहिल्या यादीमध्ये जिल्हयातील दोन गावांतील ३१२ शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. त्यांचे आधार प्रमाणीकरणासह उर्वरित प्रक्रिया यशस्वी पार पडल्यानंतर शासनाने अवघ्या चार दिवसांत २८ फ़ेब्रुवारीला दुसरी यादी जाहीर केली.

दुसऱ्या यादीत तब्बल ६१ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. सध्या आधार प्रमाणीकरणाचे काम जलदगतीने सुरू आहे. आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर बँक खात्यावर प्रत्यक्षात रक्कम भरण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शनिवार व रविवार बँकाच्या सुटया असल्याने काही प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या होत्या. आता सोमवारपासून या कामाला वेग येणार असल्याचे चित्र आहे. गावनिहाय व बँकनिहाय खातेदारांची संख्या समोर आल्याने नावे शोधण्यात खातेदारांना अडचणी आलेल्या नाहीत.

शिवाय गावात अनेक ठिकाणी ही यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, मोबाईलवर सुध्दा पीडीएफ स्वरुपात याद्या पाहता येत आहेत. साहजिकच आपले नाव कर्जमाफीच्या यादीमध्ये असून, त्यासाठी पुढे काय करावे याची माहिती खातेदारांच्या वतीने देखील घेतली जात आहे. सहकार विभागाकडून दररोज या कामांचा आढावा घेतला जात आहे. तसेच दररोजच्या कामकाजाचा अहवाल वरिष्ठ पातळीवर सादर करावा लागत आहे. 

आतापर्यंत जिल्ह्यातील ३२७ शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्यक्ष कर्जमाफीची रक्कम जमा झाल्याचे सहकार विभागाकडून सांगण्यात आले आहे. सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला आतापर्यंत मिळाला असून, उर्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्याच्या पडताळणीचे काम सध्या सुरू आहे. त्यानुसार यादीतील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा होणार आहे. 
- विश्वास देशमुख, जिल्हा उपनिबंधक 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Healthy Menopause: हेल्दी मोनोपॉझसाठी 'या' नैसर्गिक उपायांचा करा वापर, मिळतील अनेक फायदे

Rishi Kapoor: 'ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते आपल्याला सोडून जात नाहीत'; ऋषी कपूर यांच्या आठवणीत लेक अन् पत्नी भावूक

SCROLL FOR NEXT