varsha gaikwad
varsha gaikwad 
मराठवाडा

निधी कमी पडू दिला जाणार नाही : पालकमंत्री वर्षा गायकवाड

राजेश दारव्हेकर

हिंगोली : कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी शासन व प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे. कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी आवश्यक निधी जिल्हा नियोजन समितीमध्ये उपलब्ध असून याशिवाय आणखी निधी लागल्यास तो निधी देखील उपलब्ध करुन देणार असल्याची ग्वाही पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी आरोग्य यंत्रणांनी अधिक सक्षम व्हावे, यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मागणीनूसार जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे आरोग्य विषयक साधनसामुग्री, औषधी विषयक साहित्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.

अधिकाऱ्यांसोबत दुरध्वनीवरून आढावा

नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध होण्याकरिता पालकमंत्री श्रीमती गायकवाड दररोज सकाळ-सायंकाळ अधिकाऱ्यांसोबत दुरध्वनीवरून आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना देत आहेत. जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय आस्थापना, जिल्हा प्रशासनाचे कार्यालय तसेच सार्वजनिक ठिकाणाचे निर्जंतुकीकरण करून संभाव्य परिस्थितीशी मुकाबला करण्याकरीता सज्ज राहण्याचे आदेश पालकमंत्री श्रीमती गायकवाड यांनी दिले आहेत. 

प्रशासनास सहकार्य करावे

तसेच नागरिकांनी गरज नसतांना घराबाहेर पडू नये, प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे. दरम्यान, जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तू वितरणात कुठलाही अडथळा येवू देणार नाही. वितरक, विक्रेत्यांनीही अतिरिक्त दर आकारू नयेत. काळाबाजार होत असल्याचे आढळल्यास प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.

कामाशिवाय घराबाहेर पडू नका : पोलिस अधीक्षक योगेशकुमार 

हिंगोली : जिल्ह्यातील नागरिकांनी सकाळी दहा ते दुपारी एक या वेळात बाजारात खरेदी करताना दोन व्यक्‍तीत एक मीटरचे अंतर ठेवावे, कामाशिवाय विनाकारण घराबाहेर पडू नका, अशा सूचना शुक्रवारी (ता.२७) पोलिस अधीक्षक योगेशकुमार यांनी दिल्या आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्‍ह्यात संचारबंदी सुरू आहे. अत्‍यावश्यक वस्‍तुंची खरेदी करताना किराणा दुकान, भाजीपाला, मेडीकल स्‍टोअर्स आदी ठिकाणी दोन व्यक्‍तींमध्ये एक मीटरचे अंतर ठेवावे.

मदतीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन

 या व्यतीरिक्‍त विनाकारण इतर वेळात घराबाहेर पडू नये, औषधींची गरज असल्यास किंवा नागरिकांच्या शंका, विनंती असल्यास पोलिस नियंत्रण कक्ष ८६६९९००६७५ व ९४२३७०८५१८ या क्रमांकावर संपर्क साधावा, गरजूंसाठी कोणत्याही प्रकारची मदत करण्याची इच्‍छा असेल तर पोलिस कल्याण शाखेचे पोलिस निरीक्षक श्री. पाटील यांच्याकडे ९९२३४४१३१४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक योगशकुमार यांनी केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ओडिशातील लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची काँग्रेसकडून यादी जाहीर

SCROLL FOR NEXT