hingoli photo 
मराठवाडा

कळमनुरीत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

संजय कापसे

कळमनुरी (जि. हिंगोली) : कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून वारंवार सूचना व माहिती दिल्यानंतरही बाजारपेठ व बँकांमधून कामकाजानिमित्त येणाऱ्या नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याचा प्रकार दररोज समोर येत आहे. या नागरिकांना शिस्त लावण्याच्या प्रकारात प्रशासनही हतबल झाले आहे. शहरातील बँकांसमोर होणारी नागरिकांची गर्दी चिंतेचा विषय बनला आहे.

कोरोनाचा आजार पसरणार नाही याची काळजी घेण्याकरिता प्रशासनाकडून मागील दोन महिन्यांपासून जनजागृती करण्यात येत आहे. आजाराची साखळी तोडण्याकरिता सुरक्षित अंतर हेच एकमेव पथ्य असल्याचे सांगत सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी नागरिकांना वारंवार सूचना व मार्गदर्शन केले जात आहे. 

नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई

नागरिकांना आजाराचे गांभीर्य कळावे, यासाठी प्रशासनाने नियमावली तयार करून दिली आहे. यामध्ये तोंडाला मास्क बांधणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे, सामूहिक गर्दी होणार नाही याची काळजी घेणे, सुरक्षित अंतर पाळणे याबाबत माहिती देत नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्या नागरिकांविरुद्ध कारवाई सुद्धा करण्यात येत आहे.

वाढती गर्दी चिंतेचा विषय

 असे असतानाही शहर व ग्रामीण भागातील नागरिकांनी अजूनही या आजाराची गांभीर्याने नोंद घेतली नसल्याचे बँका व बाजारपेठेमधून होणारी गर्दी पाहता समोर येत आहे. शहरातील बँकांमध्ये कामकाजानिमित्त येणाऱ्या नागरिकांची मोठी संख्या पाहता या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्‍जा उडाल्याचे चित्र आहे. 

लांबच लांब रांगा

बँकांमध्ये येणाऱ्या ग्राहकांनी रांगेत येऊन बँकेचे कामकाज करावे, याकरिता बँक प्रशासनाकडून ग्राहकाकरिता सुरक्षित अंतरावर मार्किंगही टाकण्यात आली आहे. मात्र, बँकेचा दर्शनी भाग वगळता लांबच लांब रांगा लागत आहेत. नागरिकांची गर्दी पाहता या नागरिकांना शिस्त लावताना पोलिस कर्मचारीही हतबल झाल्याचे दिसून येत आहे.

विलगीकरण कक्षाला पथकाची भेट

कळमनुरी : तालुक्यातील वाकोडी येथे बुधवारी (ता. २०) जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ यांनी भेट देऊन क्‍वारंटाइन सेंटरमध्ये असलेल्या ग्रामस्थांशी संवाद साधून सोयीसुविधांची पाहणी केली.

ग्रामस्थांशी संवाद साधला

वाकोडी येथे महानगरातून परत आलेल्या ग्रामस्थांना जिल्हा परिषद शाळेतील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्या ठिकाणी उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, गटविकास अधिकारी मनोहर खिल्लारी यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. 

अंगणवाडीचीही पाहणी

त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन वैद्यकीय अधिकारी श्री. खुडे यांच्याकडून आरोग्याविषयी माहिती जाणून घेतली. तसेच अंगणवाडीचीही पाहणी केली. या वेळी सरपंच सुलोचना नाईक, शिवाजी भवर, ग्रामसेवक, श्री. घुगरे, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आदींची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Indian Army Soldier: देशसेवेचे व्रत अपुरेच राहिले! जावळीचा जवान तुषार भिलारेंची झुंज अपुरी ठरली, दोन चिमुकल्या मुलींसह कुटुंब पोरके..

SCROLL FOR NEXT