Child Marriage News
Child Marriage News esakal
मराठवाडा

बालविवाह लावल्याने मुलीने घेतली पोलिसांकडे धाव; आई-वडील,सासरच्या मंडळींवर गुन्हा

पंजाब नवघरे

वसमत (जि.हिंगोली) : वसमत येथे चार महिन्यांपूर्वी कुटुंबीयांनी बालविवाह (Child Marriage) लावल्यानंतर पीडित मुलीने थेट स्वतः पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांसह सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे नवरदेवावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुरुवारी (ता.३१) रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसमत (Vasmat) येथील एका १७ वर्षीय मुलीचा डिसेंबर २०१९ मध्ये अर्धापूर (जि. नांदेड) येथील प्रसाद राऊत नावाच्या तरुणासोबत विवाह झाला. त्यानंतर तीन महिने मुलगी सासरी होती. मात्र काही दिवसांपूर्वी सदरील मुलगी अकोला (Akola) येथील रेल्वेस्थानकावर आढळून आली. (Girl Run To Police Against Child Marriage, Cases Filed On Parent, In Laws Members In Vasmat Of Hingoli)

त्यावेळी लोहमार्ग पोलिसांनी तिची चौकशी करून तिला बालगृहात पाठवले. यावेळी बालगृहाच्या समितीने त्या मुलीची चौकशी केली. या चौकशीमध्ये त्या मुलीने तिचा बालविवाह लावण्यात आल्याचे चौकशीत नमूद केले. तसेच तिच्या पतीने अल्पवयीन असल्याचे माहीत असल्यानंतरही शरीर संबंध ठेवल्याचेही चौकशीत सांगितले. त्यानंतर मुलीच्या तक्रारीवरून अकोला लोहमार्ग पोलिस ठाण्यात मुलीच्या आई-वडिलांना सोबतच पती प्रसाद राऊत, सासरा गोविंद राऊत यांच्याविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. (Hingoli)

प्रसाद राऊत यांच्याविरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्याचे सूत्रांनी सांगितले. सदर घटना वसमत शहर पोलिस ठाणे अंतर्गत घडल्यामुळे हा गुन्हा अकोला लोहमार्ग पोलीस ठाण्यातून वसमत शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. या प्रकरणात पोलीस निरीक्षक चंद्रकांत कदम, पोलीस उपनिरीक्षक प्रतिभा शेटे पुढील तपास करीत आहेत. दरम्यान या प्रकरणात पीडित मुलीची भेट घेतली जाणार असून सदर मुलगी अर्धापूर येथून अकोला येथे गेली कशी याची माहितीही घेतली जाणार असल्याचे पोलिस विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

Crude Oil Prices: पेट्रोल-डिझेलचे दर होणार कमी! कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी घट

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT