police parade in gram panchayat election 
मराठवाडा

Gram Panchayat Election: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे संचलन; ग्रामस्थांशी संवाद

युवराज धोतरे

उदगीर (उस्मानाबाद): तालुक्यात सुरू असलेल्या 55 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची पोलिस प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे. तालुक्‍यातील संवेदनशील मतदार केंद्राच्या ठिकाणी ग्रामीण पोलिसांनी सोमवारी (ता.११) संचलन करून शांततेत मतदान पार पाडण्याचे आवाहन केले.

तालुक्यातील या 55 ग्रामपंचायतींपैकी संवेदनशील मतदार केंद्र असलेल्या निडेबन, दावणगाव, लोहारा, हेर, कुमठा व वेल्हाळ या गावात पोलिस विभागाने संचलन केले. या मतदानाच्या दरम्यान कोणत्याही प्रकारच्या अनुसूचित घटना घडू नये याविषयी तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला.

यावेळी उदगीरचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॅनियल बेन, ग्रामीण पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे, शहर पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक घारगे उपस्थित होते यावेळी आरसीबीचे एक पथक, ग्रामीण व शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी, होमगार्ड असे जवळपास पन्नास ते सत्तर कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यासह संचलन केले.

या संचलनामुळे गावांतील निवडणूक प्रक्रियेला आला आहे. शिवाय होणाऱ्या गैरप्रकारावर  निर्बंध येणार आहेत. एकदम एवढे पोलिस गावामध्ये रस्त्यावरून संचलन करत असल्याचे पाहून ग्रामस्थांतही आश्चर्य निर्माण झाले होते. या संचलनासाठी पोलिस जमादार शिवाजी केंद्रे, नामदेव सारूळे, तुळशीदास बरुरे, चंद्रकांत कलमे, राहुल गायकवाड, नानासाहेब शिंदे आदींनी पुढाकार घेतला.

(edited by- pramod sarawale)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inspirational : Glenn Phillips ची पायलट बनण्यामागची कहाणी; ८ महिने क्रिकेटपासून दूर, पण पठ्ठ्याला स्वस्थ कुठे बसवत होतं...

सिरियलमध्ये आली देशभक्त नागिण! इस्रोच्या रॉकेटला केला सलाम, नेटकऱ्यांनी एकता कपूरला केलं ट्रोल

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई

अनधिकृत गॅस गोदामातून सिलिंडरची विक्री, पुरवठा विभागाचा छापा; ५७ सिलिंडर केले जप्त, कुठं झाली कारवाई?

Maharashtra Weather: महाराष्ट्राच्या 'या' भागांमध्ये गुरुवारी पावसासह गारपीट; हवामान विभागाचा अलर्ट

SCROLL FOR NEXT