भुईमूग काढणीतून शेतमजुरांना मिळाला आधार  
मराठवाडा

भुईमूग काढणीतून शेतमजुरांना मिळाला आधार 

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : शेतीची सर्वच कामे संपल्याने शेतीवर आधारित कामे करणाऱ्या मजुरांच्या हाताला कामे नाहीत. त्‍यातच लॉकडाउनमुळे बाहेर कुठे जाता येत नसल्याने अनेकांसमोर अडचणी आहेत. मात्र, सिद्धेश्वर धरण परिसरातील अनेक गावात सध्या भुईमूग काढणी सुरू झाल्याने येथे मजुरांच्या हाताला कामे मिळाली आहेत. सोशल डिस्‍टन्सिंग ठेवून भुईमूग काढणी सुरू आहे. 

सध्या शेतशिवारात केवळ मशागतीच्या कामे सुरू आहेत. बहुतांश शेतकरी ट्रॅक्‍टरच्या मदतीने कामे करीत आहेत. त्‍यामुळे शेतीवर अधारित गावात मजुरी करणाऱ्याच्या हाताला कामेच नाहीत. काही मजूर गावात कामे उपलब्ध नसल्याने इतर ठिकाणी जावून कामे करतात. 

आरोग्य तपासणी करून घेण्याच्या सूचना 

मात्र, यावर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन, सीमाबंदीमुळे एका गावातून दुसऱ्या गावात जाणे अवघड झाले आहे. गावात नवीन कोणी आले तर त्‍याला थेट विलगीकरण कक्षात जावून आरोग्य तपासणी करून घेण्याच्या सूचना केल्या जात आहेत.


अनेक शेतकऱ्यांनी केली भुईमूगाची पेरणी 

 यामुळे कोणीही एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यास तयार नाहीत. घरीच थांबण्याला पसंती देत आहेत. यामुळे अनेकाच्या रोजदांरीचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्‍यान, औंढा नागनाथ तालुक्‍यात येणाऱ्या सिद्धेश्वर धरण परिसरात कालव्याच्या बाजुला शेती असणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी भुईमूगाची पेरणी केली आहे.

सोशल डिस्‍टन्सिंगचा वापर

 सध्या त्‍याची काढणी सुरू झाली आहे. यामुळे ढेगज, दूरचुना, वडचूना, सिद्धेश्वर, अनखळी, पोटा, कोंडशी, जवळा बाजार, करंजाळा, हट्टा आदी गावात भुईमूग काढणीला वेग आला आहे. यातुन स्‍थानिकांना रोजगार मिळत आहे. भुईमूग काढणारे मजूर तोंडाला रुमाल बांधून तसेच सोशल डिस्‍टन्सिंगचा वापर करीत आहेत. 

मजुरीपोटी दिल्या जाताहेत शेंगा
 

सकाळी लवकरच मजूर भुईमूग काढणीला जात आहेत. या मजुरांना मजुरीपोटी रोख रक्‍कमेएवजी शेंगाच दिल्या जात आहेत. काढलेल्या शेंगाच्या ढिगाचे दोन भाग करून अर्धा भाग शेतमालक घेत आहे. त्‍यांनतर राहिलेल्या अर्धा भागाचे चार समान भाग करून त्‍यातील एक भाग मजुराला दिला जात आहे. 

ओल्या शेंगाना पन्नास रुपये किलोचा भाव

दिवसभरात एक मजूर किमान वीस ते पंचवीस किलो शेंगा मिळवत आहे. ओल्या शेंगाना पन्नास रुपये किलोचा भाव आहे. दरम्‍यान, भुईमूगाच्या काढणीतून अनेकांना रोजगार मिळाल्याचे चित्र आहे. लॉकडाउनच्या काळात हाताला कामे मिळाल्याने शेतमजुरांतून आनंद व्यक्त केला जात आहे.

भुईमूगाची काढणी सुरू 

सिद्धेश्वर धरणाच्या कालव्यातील पाण्यावर भुईमूगाची लागवड केली आहे. सध्या त्‍याची काढणी सुरू आहे. शेतात येणाऱ्या मजुरांना तोंडाला रुमाल बांधणे व सोशल डिस्‍टन्सिंगचे पालन करीत कामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 
-शिवाजी पिंपरकर, भुईमूग उत्पादक शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

Marathi News Live Updates : मोहन भागवतांचा तरुणांना रोजगाराबाबत महत्त्वाचा संदेश

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

SCROLL FOR NEXT