file photo 
मराठवाडा

राहत्या घरात सापडला गुटख्याचा साठा !

गणेश पांडे

परभणी : शहरातील तेली गल्लीतील एका राहत्या घरात गुटख्याचा मोठा साठा करून ठेवल्याची माहिती सहायक पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांना मिळाली होती. त्यांनी नानलपेठ पोलिसांसह रविवारी (ता.२२) सकाळी ११ वाजता या ठिकाणी छापा मारला. या ठिकाणी लाखो रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला. पोलिसांनी कारवाई करून गुटखा तर पकडला. परंतू या गुटख्याची तक्रार देण्यासाठी अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांना वेळ न मिळाल्याने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रखडली.

परभणी शहरातील तेली गल्ली परिसरातील एका रहात्या घरात गुटख्याच्या मोठा साठा असल्याची माहिती सहाय्यक पोलिस अधीक्षक (परभणी शहर) नितीन बगाटे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे श्री.बगाटे यांनी नानलपेठ पोलिसांच्या टिमसह त्या ठिकाणी रविवारी (ता.२२) सकाळी ११ वाजता सचिन सुरेशराव नखाते यांच्या घरावर छापा मारला. त्यांच्या घरात किरायाने राहणारे अमोल देशमाने (वय ३५) यांनी त्यांच्या घरात गुटख्याचा मोठा साठा करून ठेवल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तातडीने हा गुटखा जप्त केला.

पांढऱ्या पोत्यामध्ये गुटखा
 यात राज्यशासनाने बंदी घातलेला सुगंधी पानमसाला, विविध कंपन्याचे गुटखा पाकीट, सुगंधी तंबाखूचे पुडे पोलिसांना सापडले. पांढऱ्या पोत्यामध्ये हा गुटखा भरून ठेवण्यात आला होता. पोलिसांनी धडक कारवाई करून हा गुटखा हस्तगत केला आहे. आरोपी अमोल देशमाने यास ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई सहायक पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईत नानलपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुंदन वाघमारे यांच्यासह ‘एएसपी’ च्या पथकातील कर्मचारी व नानलपेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी सहभागी झाले होते. हा सर्व गुटखा पोलिसांनी जप्त करून नानलपेठ पोलिस ठाण्यात आणला आहे. त्या ठिकाणी त्याची मोजदाद केली जाणार आहे.

अन्न व औषध प्रशासनातील अधिकारी गैरहजर
पोलिसांनी धडक कारवाई करून तेली गल्लीतून गुटख्याचा साठा जप्त केला. त्यानंतर गुटख्याची तक्रार देण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना पोलिस निरीक्षक कुंदन वाघमारे यांनी मोबाईलवरून घटनेची माहिती दिली. त्यानंतर स्वता एएसपी नितीन बगाटे हे देखील संबंधीत अधिकाऱ्यांना बोलले, त्यांना तक्रार देण्यासाठी आपण यावे, अशी विनंती देखील केली परंतू अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. उलट आज रविवारची सुट्टी असल्याने अधिकारी व कर्मचारी गावाला गेले आहेत असे सांगून एक अधिकारी मोकळा झाला.


योग्य ती कारवाई केली जाईल
आम्हाला सकाळी या घरात गुटखा असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे आम्ही ही कारवाई केली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुगंधी गुटका मिळाला आहे. योग्य ती कारवाई केली जाईल.
- नितीन बगाटे, सहायक पोलिस अधीक्षक, परभणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT