NND07KJP01.jpg 
मराठवाडा

गारपिटीसह वादळी वाऱ्याने झोडपले

कृष्णा जोमेगावकर

नांदेड : नांदेड जिल्ह्याला सोमवारी (ता. सात) पुन्हा एकदा अवकाळी पावसाने झोडपून काढले. यात गारपीटीसह वादळी वारे झाल्यामुळे भाजीपाला तसेच फळपिकांचे नुकसान झाले आहे. हा अवकाळी पाऊस कंधार व मुखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात झाला. जिल्ह्यात मंगळवारी (ता. सात) सकाळी आठपर्यंत एकूण ६५.४३ मिलीमीटर तर सरासरी ४.०९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

ठराविक दिवसानंतर अवकाळी पाऊस
जिल्ह्यात मागील काही दिवसापासून ठराविक दिवसानंतर अवकाळी पावसाने हजेरी लावत शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. हा पाऊस जिल्ह्यातील अनेक भागात होत असल्याने भाजीपाला तसेच फळपिकांना फटका बसत आहे. कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी प्रशासनाने लावलेल्या लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेले शेतकरी अस्मानी संकटाचा सामना करावा लागत आहे. 

भाजीपाला, फळपिकांना बाधा
भाजीपाला, केळी, संत्रा, मोसंबी, चिकू, पपई, टरबूज, खरबूज या फळपिकांना बाधा पोहोचत आहे. ठराविक काळानंतर होत असलेल्या अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिकांनाही बाधा पोहोचत असल्यामुळे शेतकरी चोहींकडून अडचणीत आले आहेत. सोमवारी (ता. सात) दुपारनंतर शहरासह ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. हा पाऊस कंधार तसेच मुखेड तालुक्यांत सर्वाधीक झाला. कंधारमधील फुलवळ, बाचोटी तसेच मुखेड तालुक्यातील चांडोळा, जांब, येवती या परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. जिल्ह्यातील इतर भागातही गारपिट झाल्याचे वृत्त आहे. 

हेही वाचलेच पाहिजे.....Video: कंधार तालुक्यात गारांचा पाऊस

तालुकानिहाय झालेला पाऊस (सरासरीमध्ये)
नांदेड १.८८, मुखेड ९.६७, अर्धापूर ३.३३, भोकर २.२५, उमरी १.३३, कंधार १२, लोहा ०.८३, हदगाव १.५७, हिमायतनगर सहा, देगलूर तीन, मुखेड १९.७१ तर माहूर, बिलोली, धर्माबाद व नायगाव शुन्य. एकूण ६५.४३ मिलीमीटर तर सरासरी ४.०९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

मंडळनिहाय झालेला पाऊस 
(पाऊस सरासरीमध्ये)
नांदेड शहर ९, वसरणी, वजीराबाद व तरोडा प्रत्येकी दोन, हदगाव तीन, पिंपरखेड आठ, सिंधी चार, मुखेड २९, जांब ३३, येवती २०, जाहूर १२, चांडोळा ४०, बाऱ्हाळी चार,  हिमायतनगर सात, जवळगाव पाच, सरसम सहा, दाभड नऊ, मुदखेड १५, बारड पाच, मुगट ९, किनवट सात, इस्लापूर चार, जलधारा सहा, शिवणी दोन, बोधडी आठ, देगलूर चार, शहापूर तीन, मालेगाव मक्ता चार, खानापूर व मरखेल प्रत्येकी दोन, कलंबर पाच, किनी पाच, मातुळ पाच, कंधार सात, उस्माननगर सहा, बारुळ पाच, पेठवडज २७, फुलवळ २२.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai Fire : नवी मुंबईत सिलिंडरचा स्फोट, माय-लेकीचा होरपळून मृत्यू; ऐन दिवाळीत कुटुंबावर शोककळा

Bacchu Kadu: आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाक; बुलढाण्यात बच्चू कडू यांचा संताप

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींनी दिवाळी शुभेच्छा देताना केले खास आवाहन; अयोध्येत २६ लाख दिव्यांचा जागतिक विक्रम!

Cyclone Alert India : पुढील तीन दिवस देशभरात मुसळधार पावसाची शक्यता; 'या' राज्यांत चक्रीवादळ तांडव माजवणार, IMD कडून सतर्कतेचा इशारा

Shevgaon politics: 'शेवगावातील मातब्बरांचा भाजपत प्रवेश'; निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय घडामोडी, राजळेंसोबत जाण्याचा निर्णय

SCROLL FOR NEXT