rain
rain 
मराठवाडा

तो पुन्हा येणार, मराठवाड्याला भिजवणार

कैलास चव्हाण

परभणी: ‘कोरोना’ विषाणुशी लढा सुरु असताना वरुणराजा अधुन-मधुन हजेरी लावत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. मराठवाड्यात पुढील पाच दिवसांत आकाश स्वच्छ ते अंशत: ढगाळ राहुन कमाल व कमान तापमनात किंचित वाढ होऊन मराठवाड्यात जालना जिल्हा वगळता इतर जिल्ह्यात (ता.१८ ते २२) एप्रिलदरम्यान तुरळक पावसाची शक्यता आहे.

मागील काही दिवसांपासून सातत्याने ढगाळ वातावरण निर्माण होऊन पावसाच्या सरी कोसळत आहेत. तसेच वादळी वारे सातत्याने वाहत असल्याने मराठवाड्यात फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.


वादळी वाऱ्यामुळे संत्रा, मोसंबी, पेरुचे नुकसान 
दोन दिवसांपूर्वी परभणी, हिंगोली, जालना जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे संत्रा, मोसंबी, पेरु या बागांचे नुकसान झाले आहे. त्यानंतर आता पुन्हा पावसाचा इशारा आला आहे. पुढील ता.१८ ते २२ एप्रिल दरम्यान, जालना जिल्हा वगळता अन्य जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता वंसतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या ग्रामीण कृषि मौसम सेवा विभागाने वर्तवली आहे.

उष्णतेची लाट निर्माण होईल
मराठवाड्यातील परभणी, नांदेड, जालना, बीड, हिंगोली या जिल्ह्यात तापमान ४२ ते ४३ अंशावर जात उष्णतेची लाट निर्माण होईल, असा इशारा वंसतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या ग्रामीण कृषि मौसम सेवा विभागाने दिला आहे.

कशाला बसु फटका
अवकाळी पाऊस झाल्यास रब्बी हंगामातील उशीरा पेरणी झालेला गहू, ज्वारी या पिकांना फटका बसणार आहे. परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात घेतल्या जाणाऱ्या हळद पिकाला फटका बसु शकतो. द्राक्ष बागा, पेरु, संत्रा, आंबा या फळबागांसह अन्य उन्हाळी पिकांना या पावसाचा फटका बसु शकतो.

शेतात गेलेल्यांची गैरसोय
कोरोनामुळे ग्रामीण भागातील अनेक नागरिकांनी शेतात आखाड्यावर संसार मांडला आहे. काही पुण्या-मुंबईहून आलेल्यांनी सुरुवातीपासून शेतात राहणे पसंत केले आहे. मात्र, सतत येणाऱ्या वादळी वारे व पावसामुळे अशा नागरिकांची गैरसोय होत आहे.

वादळी वाऱ्याचा फळबागांना फटका
जिल्ह्यात उष्णतेची लाट निर्माण झाली असताना पुन्हा वादळी वारे बुधवारी (ता.१५) रात्री दहाच्या दरम्यान, तुफान वादळी वारे वाहू लागले. परभणी, पूर्णा, सेलू, पाथरी या तालुक्यांत ढगाळ वातावरण होते. रात्रीच्या सुमारास पावसाचा हलका शिडकावा झाला. जिल्ह्यात बुधवारी (ता. १५) रात्री आलेल्या वादळी वाऱ्यामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. उष्णतेची लाट सुरू झाली असताना अधूनमधून ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. परभणी शहरासह परिसरात याच दरम्यान, वारे वाहण्यास सुरवात झाली. सायंकाळीच ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने पावसाची शक्यता वाटू लागली होती. परभणी, पूर्णा, सेलू, पाथरी या तालुक्यांत ढगाळ वातावरण होते. रात्रीच्या सुमारास पावसाचा हलका शिडकावा झाला. परंतु, वाऱ्याचा वेग जास्त होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahavikas Aghadi : विधानसभेसाठीही एकजूट; ‘मविआ’चा निर्धार

India Aghadi : राहुल गांधींवर ‘इंडिया’चा दबाव

Heavy Rain : पावसामुळे सिक्कीममध्ये हाहाकार! रस्ते खचले, नऊ जणांचा मृत्यू,‘तिस्ता’ची पातळी वाढली

Sasoon Hospital : मेफेड्रोन प्रकरणाचा तपास ‘एनसीबी’कडे; मुख्य सूत्रधार संदीप धुनिया मात्र अद्याप फरार

Mahayuti Leaders : महायुतीच्या नेत्यांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध; आमदारांची नाराजी दूर करण्याचा शिवसेना, राष्ट्रवादीचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT