marathwada parali vaijnath  
मराठवाडा

हृदयद्रावक : परळीत एकाच घरातील तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू

प्रा. प्रवीण फुटके

परळी वैजनाथ : तालुक्यातील दाऊदपूर शिवारात सकाळीच (ता.08) ह्रदयपिळवटून टाकणारी घटना घडली आहे. खदाणीत धुणे धुण्यासाठी गेलेल्या बहीण, भावासह तिघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परळी तालुका हादरला आहे. ख

दाऊदपुर शिवारात नांदेड जिल्ह्यातील एक मजूर कुटुंब गेल्या काही दिवसांपासून राहत आहे. ते ज्या ठिकाणी राहतात त्याला लागूनच खडी केंद्र आहे. त्या खडी केंद्राशेजारी खदाण आहे. या खदाणीमध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचलेले आहे. या कुटूंबातील मुलगी सुरेखा दांडेकर (वय १५), रेखा दांडेकर (वय१३), नारायण दांडेकर (वय०८) ही लहान मुले धुणे धुण्यासाठी सोमवारी (ता.०८) सकाळी गेले होते.

खदाणीत असलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने ते तिघेही आत मध्ये बुडाले. बऱ्याच वेळ झाला तरी मुले घरी का आले नाही म्हणून कुटुंबातील अन्य सदस्यांनी शोध सुरू केला. तेव्हा तिन्ही मूले पाण्यात बुडाल्याचे दिसून आहे. हे लक्षात येताच तत्काळ त्यांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले.

परंतु तिघांचा मृत्यू झाला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. या घटनेने कुटूंबातील सदस्यांनी यावेळी मोठा टाहो फोडला. दरम्यान उत्तरीय तपासणी साठी तिघांचे मृतदेह येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले आहेत. पुढील तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.

अशी घङली घटनाः हे भांवडे जेव्हा पाण्यात गेली त्यावेळी भाऊ रोहित बुडत असताना बहिण रेखाने पाहिले. तिने वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली तिलाही पोहता येत नसल्याने तीही बुडू लागली. या पद्धतीने या तीनही भावंडांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दरम्यान तिघेही एकाच कुटुंबातील असल्याने कुटूंबावर मोठा डोंगर कोसळला आहे..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय मुलीने १५व्या मजल्यावरून मारली उडी, घटनास्थळी सापडली चिट्ठी

Shiv Sena Symbol Dispute : शिंदे गटाने ठाकरेंचे दावे खोडले मूळ पक्षाचा प्रतिनिधी गट ठरविण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार

UPI Transaction Charges : UPI वर ०.४ टक्के शुल्क; १० हजार, १ लाख, १० लाखांच्या व्यवहारावर किती रुपये? जाणून घ्या

Marathi News Live Updates : नागपुरात भरधाव कारचा भीषण अपघात, ७ जणांना उडवलं

Helicopter Crash : भीषण अपघात! हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये कोसळलं, ३ जणांचा जागीच मृत्यू, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT