Heavy Rain In Udgir 
मराठवाडा

उदगीर तालुक्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन, ऊस व फळबागांचे अतोनात नुकसान

युवराज धोतरे

उदगीर (जि.लातूर) : तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे व काही मंडळात अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन, ऊस व फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मंगळवारी (ता.१३) रात्रीपासून पावसाला सुरवात झाली. यात अधूनमधून आलेल्या वादळाने व सततच्या पावसाने काढून ठेवलेल्या सोयाबीन पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोयाबीनची काढणी झाल्यानंतर गोळा करून ठेवलेल्या सोयाबीनच्या काडावर झाकलेल्या ताडपत्र्या उडाल्याने सोयाबीन भिजून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.


मोघा, देवर्जन व हेर या तीन महसूल मंडळाच्या पट्ट्यात अतिवृष्टी झाली आहे. यामुळे अनेक ठिकाणी सोयाबीनच्या बनीम पाण्यात गेल्या आहेत. वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील अनेक ठिकाणच्या ऊस आडवा झाला आहे. शिवाय परिसरातील पपईच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. टोमॅटो, कांदा, मिरची व नव्याने पेरलेले हरभरा या रष्षी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.सततच्या पावसाने शेतात उभे असलेली सोयाबीन पाण्याखाली गेल्याने प्रचंड नुकसान झाले आहे.

अनेक नदी, नाले, ओढ्याचे पाणी पात्र सोडून वाहत असल्याने मोठ्या प्रमाणावर लगतच्या पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणची झाडे कोसळली आहेत. अनेक ठिकाणी स्थावर मालमत्तेचे नुकसान झाले आहे. बुधवारी (ता.१४) तालुक्यातील पर्जन्यमापक आवर मंडळनिहाय नोंद झालेली आकडेवारी मिलिमीटरमध्ये पुढील प्रमाणे, उदगीर ६४.५, नागलगाव ८४.५, वाढवणा ४६.३, नळगीर ४०, मोघा ९०, हेर ५१.३, देवर्जन ९१.३, तोंडार ५४.३. तालुक्‍यातील आठ महसूल मंडळात आतापर्यंत ७९०२ मिलिमीटर तर आतापर्यंतचे एकूण सरासरी पर्जन्य ९७५.७७ मिलिमिटर एवढ्या पर्जन्याची नोंद झाली आहे.

लातूरात धो-धो : 'मांजरा' भरण्याच्या वाटेवर, 'तेरणा' चे दरवाजे उघडण्याची शक्यता !  
पावसामुळे वीज गुल
मंगळवारी रात्री सुरू झालेल्या वादळी पावसामुळे शहराचा काही भाग व ग्रामीण भागातील अनेक गावातील वीज जवळपास आठ ते दहा तास गायब झाली आहे. त्यामुळे एकीकडे वादळी वारे, दुसरीकडे पाऊस, तिसरीकडे शेतीचे नुकसान अप त्यात लाईट गेल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: नवरात्रीआधी लाडक्या बहिणींना गुडन्यूज! ऑगस्टचा हप्ता खात्यात जमा, सरकारकडून मोठी भेट

MNS Leader Arrest : राज ठाकरेंच्या शिलेदाराला फसवणूक प्रकरणात अटक, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

Super El Nino: यंदा सर्वाधिक उष्ण उन्हाळा; पाणीसंकटही तीव्र होणार ; ‘सुपर अल निनो’कडे वाटचाल

Latest Marathi News Live Update : मनोज जरागेंच्या ११ समर्थकांविरोधात गुन्हा

Ranya Rao Gold Smuggling Case : 89 कोटींचा दंड अन् 244 कोटींची कारवाई! कन्नड अभिनेत्री रन्या राव सोन्याच्या तस्करी प्रकरणात अडकली, 399 पानांचा आदेश जारी

SCROLL FOR NEXT