beed beed
मराठवाडा

अवजड वाहनाने पादचाऱ्यास चिरडले जागीच मृत्यू

मांजरसुबा-केज रस्त्यावर नेकनूर जवळील घटना

रामदास साबळे

केज (बीड): तिकिटाला पैसे नसल्याने नातेवाईकांना भेटून पायीच गावाकडे निघालेल्या पादचाऱ्यास अवजड वाहनाने चिरडल्याने जागीच मृत्यू झाला. हा भीषण अपघात मांजरसुंबा-केज रस्त्यावर नेकनूरजवळ मंगळवार (ता.२२) रोजी रात्री उशिरा झाला. या अपघातात मृत्यू झाल्याचे नाव संजय मारूती राऊत (वय-४३) रा. कानडी माळी, ता.केज असल्याचे सांगण्यात आले आहे.

तालुक्यातील कानडी माळी येथील संजय राऊत हे चौसाळा येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते. नातेवाईकांना भेटून ते मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास प्रवास भाड्याला देण्यास जवळ पैसे नसल्याने नेकनूरहून गावाकडे परत पायी निघाले होते. मांजरसुबा-केज रस्त्याच्या कडेने पायी चालत असताना नेकनूर शहरालगतच्या पुलाच्याजवळ आले असता भरधाव वेगात येणाऱ्या पोकलेन मशीन वाहून नेणाऱ्या अवजड वाहनाने (एमएच-१६/ एवाय-५५३३) चिरडले. या भीषण अपघातात संजय राऊत यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर मृतदेह उच्चस्तरीय तपासणीसाठी नेकनूर येथील शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आला. अपघातात मृत्यू झालेल्या संजय राऊत यांच्या पश्चात, पत्नी, चार मुली, एक मुलगा असा परिवार आहे. पोलिसांनी अवजड वाहन चालकास ताब्यात घेण्यात आले असून याप्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींना किस केलं, सुरक्षा रक्षकानं तरुणाला पकडलं अन्...; बाईक रॅलीतील व्हिडिओ व्हायरल

Whatsapp Call Feature : इंटरनेट, नेटवर्क नसतानाही व्हॉट्सअ‍ॅप कॉल करता येणार, ते कसे? पाहा एका क्लिकवर

Video : ₹2,500,000,000 मध्ये बनलेल्या रणबीर-आलियाच्या आलिशान घराची झलक समोर ! असं आहे घराचं इंटिरियर

सोनी BBC अर्थने धर्मेश बरई यांचा ‘अर्थ चॅम्पियन’ म्हणून गौरव केला

Manoj Jarange : सरकारच काय, सरकारचा बाप जरी आला तरी आरक्षण घेणार, तेही ओबीसीतूनच....मनोज जरांगेंचा निर्धार

SCROLL FOR NEXT