file photo
file photo 
मराठवाडा

हिंगोली : माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेला नागरिकांमधुन चांगला प्रतिसाद

राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यात कोरोना नियंत्रणासाठी तसेच मुत्युदर कमी करण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी कोविड महाराष्ट्र मुक्त ही  मोहिम दोन टप्प्यात राबविण्यात येत आहे.

जिल्ह्यात या मोहिमेचा  शुभारंभ पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. सदर मोहिम जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी व मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार असुन या मोहिमेचे तंतोतंत नियोजन करण्यात आले. या मोहिमेत जिल्ह्यातील एकुण १२ लाख १७ हजार ४५८  लोकसंख्या व कुटुंब संख्या दोन लाख ३६ हजार ७१६  ऐवढ्या कुटुंबाची आरोग्य तपासणी करावयाची आहे. त्यामध्ये ग्रामीण भाग कुटुंब संख्या एक लाख ९३ हजार ७३७ तर शहरी भाग कुटुंब संख्या ४२ हजार ९७९  ऐवढी होती या करीता जिल्ह्यात आरोग्य विभागामार्फेत ५९५ पथक स्थापन करण्यात आली होती त्यामध्ये १७८५ कर्मचारी होते.

आजपर्यत जिल्ह्यातील दोन लाख २४ हजार ७३० कुटुंबाला पथकाने भेटी

संदर्भ सेवेसाठी ३७ डाँक्टर ,अंब्युलन्स २९ उपलब्ध करण्यात आल्या. याकरीता पथकातील कर्मचारी यांना टिशर्ट अँप्रोन, टोपी, बँच व प्रसिद्धी साहित्य देण्यात आले. या मोहिमेची आरोग्य विभागामार्फेत जिल्ह्यातील गावोगावी मोठ्या  प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे व  कोरोना एक्सप्रेसद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांमध्ये  कोरोना या आजाराबदल प्रभावीपणे जनजागृती झाली ता. १५ ते  आजपर्यत जिल्ह्यातील दोन लाख २४ हजार ७३०  कुटुंबाला पथकाने भेटी देऊन आरोग्य तपासणी केली तसेच त्यांना घरोघरी जाऊन आरोग्य शिक्षण दिले.

मोहिमेचे तपासणी काम ९६ टक्केच्या वर झाले

यामोहिमे दरम्यान आरोग्य तपासणी मध्ये आढळून आलेल्याना रुग्णालयात पुढील तपासणी करीता संदर्भित करण्यात आले. या मोहिम दरम्यान जिल्ह्यातील गावांना जिल्हा आरोग्य अधिकारी डाँ.शिवाजी पवार यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी केली व कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणी सोडविल्या. डाँ.पवार यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे मोहिमेचे तपासणी काम ९६ टक्केच्या वर झाले. यामोहिम काळात जिल्ह्यात झालेल्या कामाचा दैनंदिन अहवाल जिल्ह्यास्तरावर एकञित करण्यात येते  व वरिष्ठ कार्यालयास वेळेत सादर करण्यात येतो  या कामी साथरोग वैद्यकीय अधिकारी डाँ.गणेश जोगदंड यांच्या नियंत्रणाखाली पथक स्थापन करण्यात आले होते.

जिल्ह्यातील यंत्रणा कामाला

त्यामध्ये उद्धव थिटे, साहेबराव नरोटे नरेंद्र पत्की,राहुल मोरे,यांनी सर्व जिल्ह्यातील अहवाल एकञित करुन वेळेत वरिष्ठ कार्यालयास सादर केले. या मोहिमेत जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका,स्वयसेवक, आरोग्य कर्मचारी स्ञी, पुरुष, समुदाय आरोग्य अधिकारी वैद्यकीय अधिकारी ,तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक, या सर्वाचे काम पाहुन जिल्हाधिकारी  रुचेश जयवंशी व मुख्य कार्यकारी अधिकारी  राधाबिनोद शर्मा यांनी प्रशंसा करुन अभिनंदन केले.

संपादन - प्रल्हाद कांबळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accident: ...अन् बदलला अल्पवयीन गुन्ह्याचा कायदा; पोर्शे प्रकरणात फडणवीसांनी दिला निर्भया केसचा संदर्भ

HSC Result: बारावीनंतर नोकरी करायची आहे ? रेल्वेमध्ये करा उत्तम करिअर, टीटीई होण्यासाठी अशी करा तयारी

Indigo Flight : इंडिगोची फ्लाइट की रेल्वेचा जनरल डबा! ओव्हरबुक झाल्याने प्रवाशाचा उभे राहून प्रवास, अखेर...

Pune Porsche Accident : कल्याणीनगर अपघातातील अल्पवयीन आरोपीला शिक्षा होणार का? देवेंद्र फडणवीसांनी दिले स्पष्ट संकेत

Gautam Gambhir: 'धोनी ज्याप्रकारे स्पिनर्सचा...', चेन्नई-कोलकाता लढतीबद्दल गौतम गंभीर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT