हिंगोली: जलयुक्त शिवार अभियानात 28 कोटींची कामे पूर्ण
हिंगोली: जलयुक्त शिवार अभियानात 28 कोटींची कामे पूर्ण  
मराठवाडा

हिंगोली जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाची 28 कोटींची कामे पूर्ण

सकाळवृत्तसेवा

हिंगोली - जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मागील आर्थिक वर्षातील मंजूर झालेल्या कामांवर आतापर्यंत तब्बल 28 कोटी रुपयांची अडीच हजार कामे पूर्ण झाली आहेत. जिल्ह्यात आता मोठा पाऊस झाल्यास कोट्यावधी लिटरचा पाणीसाठा होणार आहे.

जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कृषी विभाग, भुजल सर्वेक्षण विभाग, वन विभाग, कार्यकारी अभियंता (पाणी पुरवठा), कार्यकारी अभियंता (जलसंधारण), कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग व ग्रामपंचायत आदी प्रमुख यंत्रणांमार्फत कामे केली जात आहेत. यामध्ये मातीनाला बांध, आर्दन स्ट्रक्‍चर, लुजबोल्डर स्ट्रक्‍चर, रिजार्ट शॉफ्ट, केटी वेअर दुरुस्ती, सिमेंट नाला बंधाऱ्यातील गाळ काढणे आदी कामांचा समावेश आहे. या योजनेमधे जास्तीत जास्त कामे पूर्ण होऊन जिल्हयात मुबलक पाणीसाठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठक घेऊन दोन हजार 899 कामांना मंजुरी दिली होती. सदर कामे आकरा हजार हेक्‍टर क्षेत्रावर घेण्यास मान्यता दिली होती.

सध्याच्या स्थितीत जिल्ह्यात अडीच हजार कामे पूर्ण झाली आहेत. या कामांवर आता पर्यंत 28 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. यामधे कृषी विभागाच्या सुमारे दोन हजार कामांवर आकरा कोटी 54 लाख रुपये, भुजल सर्वेक्षणच्या 71 कामांवर 22 लाख रुपये, वन विभागाच्या सव्वा तीनशे कामांवर साडेआठ कोटी रुपये, पाटबंधारे विभागाच्या 28 कामांवर तीन कोटी 17 लाख रुपये, लघुसिंचन विभागाच्या साठ कामांवर दोन कोटी रुपये, ग्रामपंचायतीच्या 42 कामांवर एक कोटी 72 लाख रुपये खर्चाचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Nirupam : ''माझी घरवापसी होतेय, तीस वर्षांनंतर पुन्हा शिवसेनेत...'', संजय निरुपम यांचा पक्षप्रवेश ठरला

AstraZeneca Covid Vaccine Side Effects: किती ट्रायल घेतल्यानंतर कोविशील्ड लसीला मंजूरी मिळाली? आता का होतायत आरोप?

Smart TV Tips : Smart TV सतत बंद पडते, सिग्नल जातो तर घरीच करा ठिक, या टिप्स वापरून पहा

Latest Marathi News Live Update: शिवरायांचं 'ते' वाघनखं महाराष्ट्रात येणं लांबलं

Satara News : आमदार मकरंद पाटील उदयनराजेंच्या प्रचारात दिसत नाहीत; शंभूराज देसाईनी सांगितलं हे कारण

SCROLL FOR NEXT