file photo
file photo 
मराठवाडा

हिंगोली : हरणाची शिकार करणाऱ्या सहा जणांना वन विभागाकडून कोठडी

राजेश दारव्हेकर

हिंगोली : तालुक्यातील उमरा वाबळे शिवारात काही जण हरणाची शिकार करीत असल्याचे एका शेतकऱ्यांने काढलेल्या व्हिडीओमुळे निदर्शनास आले. त्यानंतर वन विभागाच्या पथकाने चौकशी करून सहा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. नंतर न्यायालयाने या आरोपींना गुरुवारी (ता. २४) चार दिवसाची वन कोठडी सुनावली आहे.

हिंगोली तालुक्यातील उमरा वाबळे शिवारात साटंबा येथील महादु वाबळे यांचे शेत आहे. या शेतात बोराळवाडी येथील काही जण जाळ्या टाकून हरणाची शिकार करीत होते. यावेळी जाळ्यात पडलेले हरिण जोर- जोराने ओरडत होते. त्यामुळे श्री वाबळे यांनी शेतात पाहणी केली असता काही जण हरिण पकडून त्याला बांधत होते. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांना रोखून एक व्हिडीओ काढून तो व्हायरल केला व पकडलेले हरिण सोडून देण्यास सांगितले. 

हे आहेत आरोपी

या व्हिडीओवरुन विभागीय वनाधिकारी कामाजी पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. बी. टाक यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शहनिशा करून सहा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. यात किसन घंगाळे, रूस्तुम ढाकरे, विठ्ठल पाचपुते, गजानन धनवे, मनोहर ढाकरे, सिध्दनाथ पाचपुते सर्व राहणार बोराळवाडी यांचा समावेश आहे.

हरणाची शिकार करण्याचे साहित्य, जाळी, हत्यार इत्यादी साहित्य जप्त

या सहाही आरोपीना चार दिवसांची वन कोठडी येथील न्यायालयाने सुनावली आहे . उमरा भागातून अटक करण्यात आलेल्या या सहा आरोपीकडून हरणाची शिकार करण्याचे साहित्य, जाळी, हत्यार इत्यादी साहित्य जप्त करण्यात आल्याचे वन विभागाच्या पथकाकडून सांगण्यात आले. गुरुवारी सहा आरोपींना हिंगोली न्यायालयामध्ये हजर केले असता प्रथम वर्ग न्यायाधीश श्री. जोशी यांनी सहा आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती सहायक सरकारी वकील अनिल इंगळे यांनी दिली.

या प्राण्यांचीही शिकार होत आहे

दरम्यान जिल्ह्यात  रानडुक्कर, हरिण, तित्तर, बटर, मोरांची शिकार होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच रोही या प्राण्याचीही शिकार होत आहे. या प्रकाराकडे वन विभागाने लक्ष देणे आवश्यक असल्याचे वनप्रेमी सांगत आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashi Tharoor T20 WC 2024 : माझा मतदारसंघ करणार वर्ल्डकपमध्ये प्रतिनिधित्व.... शशी थरूर भारतीय संघाची घोषणा होताच हे काय म्हणाले?

Poorest Politicians: भारतातील सर्वात गरीब 'पुढारी' कोण आहेत? ज्यांच्याकडे आहे फक्त 1,700 रुपयांची मालमत्ता

Latest Marathi News Live Update: अमेठी, रायबरेलीची जागा लवकरच जाहीर होणार; खर्गे घेणार पत्रकार परिषद

Rupali Ganguly: वेट्रेस म्हणून केलं काम, गाजवला छोटा पडदा अन् आता भाजपमध्ये प्रवेश; जाणून घ्या अनुपमा फेम रुपाली गांगुलींबद्दल

Amit Shah Fake Video Case : रेवंथ रेड्डींचे वकील दिल्ली पोलिसांसमोर हजर; दिली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT