भूगर्भातून गूढ आवाज 
मराठवाडा

वसमत, कळमनुरी तालुक्यातील काही गावात भूगर्भातून आवाज; ग्रामस्थांमध्ये भिती

सतत होणाऱ्या आवाजाने गावकऱ्यांमध्ये भिती निर्माण झाली आहे.

राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यात वसमत व कळमनुरी तालुक्यातील काही गावांत मंगळवारी (ता.१२) सकाळी ६.४४ व ८.१८ वाजता भूगर्भातून दोन आवाज आल्याने जमीन हादरली. मात्र यामुळे कोणतीही हानी झाली नाही. याची कोणतीही नोंद झाली नाही. हा सौम्य धक्का असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने सांगण्यात आले. वसमत (Vasmat) तालुक्यातील पांगरा शिंदे, वापटी, कुपटी, खांबाळा, सिरळी व कळमनुरी (Kalamnuri) तालुक्यातील बोल्डा या पट्ट्यात असलेल्या गावात मंगळवारी सकाळी ६.४४ व त्यानंतर ८.१८ वाजता भूगर्भातून दोन आवाज झाले. यामुळे या गावातील गावकरी रस्त्यावर आले गावात कोठे काही झाले का याची माहिती घेत होते. (Hingoli Sound Come Out From Ground In Vasmat And Kalamnuri Taluka)

या आवाजाने कोणतेही नुकसान झाले नसल्याचे गावकरी भागवत शिंदे, गणेश खंडागळे, नागोराव जांबुतकर यांनी सांगितले. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावात मागच्या अनेक वर्षांपासून जमिनीतून गूढ आवाज येत आहेत. आतापर्यंत दीडशे ते दोनशे वेळा आवाज आले आहेत. दोन ते तीन वेळा या गावात आवाज आल्याने त्याची नोंद रिश्टर स्केलवर झाली होती. ते भूकंपाचे धक्के होते.

त्यांनतर परत भूगर्भातून आवाज येण्याची मालिका सुरुच आहे. मंगळवारी सकाळी दोन वेळा पांगरा शिंदे व या गावाच्या पट्ट्यात येणाऱ्या गावात भूगर्भातून आवाज आले. मात्र याची कोणतीही नोंद झाली नसल्याचे हिंगोली (Hingoli) जिल्हा आपती व्यवस्थापनाचे रोहित कंजे यांनी सांगितले. तसेच हा सौम्य धक्का असल्याचे ते म्हणाले. सतत होणाऱ्या आवाजाने गावकऱ्यांत भिती निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Ghaywal Acquitted : निलेश घायवळसह सहा आरोपींची निर्दोष मुक्तता; मोका न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

Bank Holiday October 2026: ऑक्टोबरमध्ये बँका 16 दिवस बंद! महाराष्ट्रात किती दिवस सुट्टी? पाहा RBIची संपूर्ण यादी

Chiplun Municipality : चिपळूण नगरपालिकेत नोकरीसाठी 15 लाखांची मागणी? सत्ताधारी नगरसेवकाच्या गंभीर आरोपामुळे खळबळ, प्रशासनाचे स्पष्टीकरण

‘या’ राशींचे लोक असतात खूप जास्त इमोशनल, भावनेच्या भरात घेतात निर्णय, नंतर होतो पश्चात्ताप; त्यांच्या या स्वभावाचा फायदा घेतात लोक

Marathi News Live Updates: मुंबई-अहमदाबाद मार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT