हिंगोली बाजारपेठ 
मराठवाडा

हिंगोली : अनाधिकृत एच. टी. बीटी कापुस बियाणे खरेदी न करण्याचे आवाहन- कृषी विभाग

बाजारात बोगस कंपन्या खाजगी एंजट, खाजगी व्यक्तीमार्फत परवाना नसलेली अनाधिकृत एच. टी. बीटी कापुस बियाणे छुप्या मार्गाने पुरवठा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राजेश दार्वेकर

हिंगोली : शेतकऱ्यांनी अनाधिकृत एच. टी. बीटी ( B.T.cotton seeds) कापुस बियाणे खरेदी न करण्याचे आवाहन हिंगोली कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी (farmer) कुठल्याही अनधीकृत कंपन्यांच्या आमिषाला बळी पडू नये असे आवाहन केले. Hingoli: Unauthorized b. T. Appeal not to buy Bt cotton seeds- Department of Agriculture

बाजारात बोगस कंपन्या खाजगी एंजट, खाजगी व्यक्तीमार्फत परवाना नसलेली अनाधिकृत एच. टी. बीटी कापुस बियाणे छुप्या मार्गाने पुरवठा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा अनाधिकृत बी. टी. बियाणांना काही व्यक्ती तणनाशक बी. टी., आर. आर. बी. टी., बी. टी. बी. जी -३ या नावाने संबोधतात. एचटी. बी. टी. तणनाशक बी. टी. आर. आर. बी. टी. या अवैध बियाण्यांना शासनाची मान्यता नाही अशा प्रकारचे बी. टी. बियाणे विक्री करणे, बाळगणे, साठा करणे गुन्हा आहे. या प्रकारचे अनाधिकृत कापुस बियाणे लागवड केलेल्या कापुस पिकाचे पानांचे नमुणे व उत्पादीत कापसाचे नमुणे येऊन त्यांची एच. टी. बी. टी. जनुके तपासणी करण्याचे तंत्रज्ञान अवगत झाले असून त्याचे नमुना तपासणी अंती एच. टी. बी. टी, जनुके आढळल्यास संबंधितांवर अनुषंगीक कारवाईची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा - जिल्ह्यातील कोविड सेंटर आणि आरोग्य विभागास आपल्या स्तरावरुन सुचित करण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे

या प्रकारचे अनाधिकृत बियाणे विक्रीसाठी बोगस कंपन्या खाजगी एंजट, खाजगी व्यक्ती निरनिराळे आमिष दाखवून प्रलोभन देतील त्यास बळी पडु नका. आपली फसवणुक होऊ शकते. शासनाची मान्यता नसलेल्या एच. टी. बी. टी. बियाणे लागवडीनंतर ग्लायफोसेट हे तणनाशक फवारण्याची बनावट कंपनी व विक्रेते शिफारस करतील. दरम्यान, ग्लायफोसेट हे तणनाशक कार्सिनोजनीक गुणधर्माचे असुन त्याच्या वापरामुळे मानवी आरोग्यास कँन्सर सारखे रोग उदभवण्याची शक्यता आहे व त्याच्या अतीवापरामुळे जमिनीची सुपिकता नष्ट होऊन भविष्यात त्या जमिनीत कोणतेही पिक लागवड करता येणार नाही. जमिन नापिक होईल. सर्व शेतकरी शेतमजूर यांचे आरोग्य धोक्यात येईल. ग्लायफोसेट या तणनाशकाचा केवळ पिके नसलेल्या जमिनीवर व चहा मळ्यासाठी वापर करण्याची शिफारस केंद्र शासनाने केली आहे.

या व्यतीरिक्त ग्लायफॉसेट हे तणनाशक इतर पिकांवर वापरता येणार नाही. मान्यता नसलेल्या एच.टी. बी. टी. कापसाची लागवड रोखणेसाठी व कार्सिनोजेनिक गुणधर्म असलेल्या ग्लायफॉसेटच्या वापरामुळे होणारे नुकसान रोकणेसाठी गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत कंपनी उत्पादीत व अधिकृत बियाणे विक्री परवाना धारकाकडुनच परवानगी असलेले कापुस बी. टी. बियाणे खरेदी करावे. आपली फसवणुक टाळण्यासाठी, बनावट, भेसळयुक्त बियाणे खरेदी बळण्यासाठी अधिकृत विक्रेत्याकडून महाराष्ट्र राज्यात परवानगी असलेले अधिसुचित बियाणेच पावतीसह खरेदी करावे. अनाधिकृत बी. टी. बियाणे खरेदीसाठी बनावट कंपन्या खाजगी एजंट' खागजी व्यक्ती आपणास आमिष, प्रलोभन देत असतील तर आपल्या तक्रारी विषयी माहिती तालुका कृषि अधिकारी कार्यालय , जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय व कृषि विभाग जिल्ला परिषद यांना देण्यात यावी असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी व्ही. डी. लोखंडे व जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी एन. आर. कानवडे यांनी केले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sindkhed Raja Nagaradhyaksha Election : शरद पवारांचा २१ वर्षीय उमेदवार बनला नगराध्यक्ष, १५८ मतांनी विजयी; कोण आहे सौरभ तायडे?

U19 Asia Cup Final: भारतीय फलंदाजांची पाकिस्तानच्या माऱ्यासमोर शरणागती; पराभवासह विजेतेपदाचं स्वप्नही भंगलं

'माझी वडिलांशी तुलना करू नका' लक्ष्मीकांत बेर्डेंबद्दल बोलताना अभिनय म्हणाला... 'त्याची उणीव...'

Jalgaon Accident : जळगावात अपघातांचे सत्र! दोन वेगवेगळ्या भीषण अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Navi Mumbai: नवी मुंबई ते नागपूर विमानसेवा सुरू होणार; कधीपासून अन् तिकीट दर काय असणार? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT