hingoli photo 
मराठवाडा

हिंगोलीच्या 'पक्षीप्रेमी' मुख्यधिकाऱ्यांनी दिला पर्यावरण जपण्याचा संदेश

हिंगोली शहरातील निसर्गरम्य वातावरणातील चिराग शाह बाबा दर्गा परिसरात शुक्रवारी (ता. २१) मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे हे नगरपालिकेच्या वतीने सुरु असलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी गेले होते.

राजेश दार्वेकर

हिंगोली : येथील जंगलक्षेत्रात विविध प्रजातींचे वन्यजीव (Wild animal) असून त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी सर्वांची आहे. सध्या कडाक्याच्या उन्हामुळे तहानेने व्याकुळ झालेली पक्षी (bird) तडफडत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरासमोर वन्यजीवाकरीता पिण्यासाठी पाणी ठेवावे, पर्यावरण जपावे असा संदेश हिंगोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे (Co Ajay kurwade) यांनी दिला. (Hingoli's- 'birdpity'- chief- gave -a message- to -protect the -environment)

हिंगोली शहरातील निसर्गरम्य वातावरणातील चिराग शाह बाबा दर्गा परिसरात शुक्रवारी (ता. २१) मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे हे नगरपालिकेच्या वतीने सुरु असलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी गेले होते. पाहणी झाल्यानंतर त्यांनी अचानक त्यांच्या वाहनातून कॅमेरा काढला आणि निसर्गरम्य वातावरणातील छायाचित्र काढण्यास त्यांनी सुरुवात केली. यावेळी त्यांनी विविध प्रजातीच्या पक्ष्यांची छायाचित्रही कॅमेरात टिपले. यावेळी मात्र सोबतचे सहकारी अधिकारी व कर्मचारी पक्षीप्रेमी मुख्याधिकारीऱ्याकडे बघतच राहिले.

हेही वाचा - गावकऱ्यांच्या वतीने मोरेगाव येथे २० खाटांचे मोफत कोरोना सेंटर

यावेळी त्यांनी सोबतच्या सहकाऱ्यांना परिसरातील विविध पक्ष्यांची माहिती दिली. पक्ष्यांचा अधिवास, स्थलांतर याबाबत सर्वांनाच कुतुहल वाटते. परंतु विविध पक्ष्यांची सर्वांना माहिती व्हावी त्यांचे संवर्धन व्हावे यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत असेही त्यांनी यावेळी सांगितले. पुर्वीपासूनच मुख्याधिकारी डॉ.अजय कुरवाडे यांना पक्षिनिरीक्षणाचा छंद आहे. सुट्टीच्या दिवशी वेळात वेळ काढून ते तलावांवर, माळरानांवर पक्षी पाहण्यासाठी जातात, त्यांची ओळख पटविणे, नोंदी घेणे व निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत पक्ष्यांचा अभ्यास करून छंद जोपासतात.

शहरातील निसर्गमय चिराग शाह बाबा दर्गा परिसरात मुख्याधिकारी डॉ. कुरवाडे यांनी विविध प्रजातीच्या पक्ष्यांचे छायाचित्र आपल्या कॅमेर्‍यामध्ये कैद केली. या ठिकाणी जवळपास वीस ते पंचवीस प्रजातीचे पक्षी होते. त्यापैकी पक्षी- धान तिरचिमणी, निसर्गवास गवती कुरणे आणि दगडाळ प्रदेश, घोलर टीलवा निसर्गवास दलदली तसेच चिखलानी पाणथळ जागा, मोठा बगळा निसर्गवास सरोवरे तलाव आणि चिखलानी प्रदेश आदी पक्ष्यांची मुख्याधिकारी डॉ. कुरवाडे यांनी छायाचित्रे टिपली आहेत.

येथे क्लिक करा - Good News : नांदेड जिल्ह्यात कोरोना काळात ८७ शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन

वाशिम जिल्ह्यातील कारंजा नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांची हिंगोली येथे नियुक्ती करण्यात आली. रुजू झाल्यापासून शहरातील विविध विकास कामावर त्यांनी भर दिला. माझी वसुंधरा माझी जबाबदारी अभियान प्रभाविपणे राबवत शहरातील सुशोभीकरण, रस्त्यांची कामे अतिक्रमण हटाव मोहीम राबवून त्यांनी कारवाई केली. माझी वसुंधरा अभियान अंतर्गत तयार केलेल्या रोपवाटिकेत त्यांनी पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. विशेष म्हणजे रस्त्यावर उतरुन काम करणारे अधिकारी म्हणून डॉ. कुरवाडे यांची ओळख आहे. सध्या कोरोनाच्या अनुषंगाने संचारबंदीत आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर मुख्याधिकारी डॉ. कुरवाडे व त्यांचे पथक रस्त्यावर उतरुन धडक कारवाया करीत आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Mohibullah Ansari : कोण आहेत मोहिबुल्लाह अंसारी? अमेरिकेत मिळणार ‘एशियन हिरो अवॉर्ड’; जाणून घ्या IPS अधिकाऱ्याचा प्रेरणादायी प्रवास

Ladki Bahin Yojana August 2026 Installment GR : लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट हप्त्याचा GR आला; खात्यात 1,500 जमा होणार की 3,000 शासन निर्णयात नेमकं काय?

Vinod Kambli ने ठाण्याच्या हॉस्पिटलमधून पोस्ट केला Video; प्रकृतीबाबत सांगायचं सोडून, काय बोलतोय ऐका; नेटकरी म्हणाले...

Latest Marathi News Live Update : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल; २२ तासांपासून विसर्जन मिरवणूक, थोड्याच वेळात बाप्पाला निरोप

IND vs WI: विराट कोहली अन् शुभमन गिल यांच्यात 'कड्याकाचं' भांडण? स्टार फलंदाज कर्णधाराला बोट दाखवत बडबडला Video Viral

SCROLL FOR NEXT