bike latur.jpg 
मराठवाडा

लातूर : लिंबू विक्रेत्याच्या दुचाकीला धडक, जाग्यावरच जीव गेला  

गौस शेख

बेलकुंड (जि.लातूर ): औसा येथे लिंबू विक्री करण्यासाठी निघालेल्या दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने धडक दिली. आणि त्यात तो जागेवरच मृत्युमुखी पडला. ही हृदयद्रावक घटना औसा तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील मनोहर तांडा येथे घडली.

औसा-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील मनोहर तांडा (ता.औसा) येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी चालकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. १३) सकाळी घडली. चंद्रकांत विठ्ठल हुलगुंडे (वय ५५) (रा. करजखेडा ता. जि. उस्मानाबाद) असे मृत दुचाकी चालकाचे  नाव आहे. या प्रकरणी कैलास हुलगुंडे यांच्या फिर्यादीवरून भादा येथील पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत हुलगुंडे हे (एमएच २५ एपी ८८९८) या दुचाकीवरून औसा येथे लिंबू विक्री करण्यासाठी पहाटेच्या सुमारास निघाले असता त्यांच्या दुचाकीला महामार्गावरील मनोहर तांडा येथे अज्ञात वाहनाने मागून जोरात धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. बेलकुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी पुढील तपास बीट अंमलदार कमाल शेख हे करित आहेत. 

औसा तालुक्यातील कोरोनाचा दुसरा बळी
कोरोना बाधित असलेल्या महिलेचा विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील रूग्णालयात उपचारादरम्यान गुरुवारी (ता. 11) रात्री नऊ वाजता मृत्यू झाल्याने औसा तालुक्यात हा कोरोनाचा दुसरा बळी ठरला असल्याने तालुक्यात भितीचे वातावरण पसरले आहे.

मुंबईहून प्रवास करून येल्लोरी (ता. औसा) येथील गावात ही महिला आपल्या परिवारास आली होती. मात्र या महिलेची प्रकृती व्यवस्थित नसल्याने बेलकुंड येथील एका खासगी दवाखान्यात उपचार घेतले मात्र या महिलेच्या प्रकृतीत सुधारना होत नसल्याने आणि या महिलेला सर्दी, खोकला दमा असल्याने या गंभीर अवस्थेत लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील रूग्णालय शनिवारी (ता. सहा) उपचारासाठी आणले होते. मात्र या महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तीला व्हेटीलेंटरवर ठेवण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT