file photo 
मराठवाडा

बेरोजगार दिव्यांगांकडून महापालिकेसमोर होळी

अभय कुळकजाईकर

नांदेड - अंदाजपत्रकात दिव्यांगांसाठी पाच टक्के निधीची तरतूद जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त यांनी महापालिका अर्थसंकल्पात ठेवली नाही. त्यामुळे बेरोजगार दिव्यांगांकडून महापालिकेसमोर अर्थसंकल्पाच्या अंदाजपत्रकाची सोमवारी (ता. नऊ) होळी करण्यात आली.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांच्याकडून २०२० - २०२१ चा सुधारित ६४५ कोटी ६४ लाख रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीकडे सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पातील अंदाजपत्रकात विविध विकास कामांसाठी कोट्यवधी रूपयांची तरतूद ठेवण्यात आली. परंतु शासन निर्णयाप्रमाणे शहरातील दिव्यांगांच्या विविध कल्याणकारी योजनांसाठी पाच टक्के निधीची तरतुद  ठेवण्यात आली नाही. केवळ अंदाजीत तीन कोटी ४२ लाख रूपये तरतूद ठेवण्यात आली. जी की पाच टक्केप्रमाणे ३० कोटी ३४ लाख रूपये एवढे ठेवणे बंधनकारक होते. 

निवेदन केले सादर
ही बाब जेव्हा बेरोजगार दिव्यांगांचे अध्यक्ष राहुल साळवे यांना वर्तमानपत्रातुन कळाली तेंव्हा त्यांनी निवेदन तयार केले. श्री. साळवे यांनी महापालिकेच्या २०२० - २०२१ च्या अर्थसंकल्पात दिव्यांगांसाठी शासन निर्णयानुसार पाच टक्के राखीव निधीची तरतूद करण्यात आली नसल्यामुळे जाहीर निषेध करत या अर्थसंकल्पाच्या प्रती महापालिका कार्यालयासमोर सोमवारी (ता. नऊ) जाळत होळी साजरी करून यावर बहिष्कार टाकत असल्याचे निवेदन आपल्या शिष्टमंडळांना घेऊन महानगरपालिका गाठली. परंतु शासकीय कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसाचा आठवडा झाल्यामुळे शनिवारी (ता. सात) कार्यालयात शुकशुकाट होता. 

आयुक्तांना दिले निवेदन
दुसऱ्या दिवशी रवीवार असल्यामुळे सोमवारी (ता. नऊ) बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीद्वारे महापालिकेसमोर अर्थसंकल्पातील अंदाजपत्राच्या प्रती जाळून होळी करण्यात आली. यावेळी राहुल साळवे, संजय धुलधाणी, नागनाथ कामजळगे, सुनिल जाधव, अमरदीप गोधने, अब्दुल माजीद शेख चांद, कार्तिक भरतीपुरम, गजानन कावळे, प्रकाश नागोरे, दिलीप कांबळे, भोजराज शिंदे यांच्यासह इतर दिव्यांग सहभागी झाले होते. शेवटी जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त डॉ. विपीन यांना दिव्यांग शिष्टमंडळाने निवेदन देऊन चर्चा केली.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT