जालना : जुना मोंढा परिसरात आढळलेला होम क्वारंटाईन केलेला रुग्ण रुग्णवाहिकेत बसताना.  
मराठवाडा

Video : जालन्यात होम क्वारंटाईन रुग्ण मोकाट 

उमेश वाघमारे

जालना -  देशात कोरोनाचा लढा सुरू आहे. मात्र, जालन्यात यंत्रणा झोपा काढीत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील जुना मोंढा परिसरात एक होम क्वारंटाइन रुग्ण शुक्रवारी (ता.तीन) आढळून आला. याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणा, जिल्हा नियंत्रण कक्ष, पोलिस आणि रुग्णवाहिकेला देण्यात आली. मात्र घटनास्थळी केवळ पोलिस दाखल झाले. सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत जिल्हा आरोग्य यंत्रणा किंवा रुग्णवाहिका या व्यक्तीच्या मदतीला आलीच नाही. 

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू केले आहे. कोरोनाचा विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून अनेकांची तपासणी करून होम क्वारंटाइनच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, अनेक होम क्वारंटाइन रुग्ण मोकाट फिरत आहेत.

जालना शहरातील जुना मोंढा येथे औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद येथील एक होम क्वारंटाइन रुग्ण सकाळी नऊ वाजल्यापासून फिरत होता. त्याच्याकडे जालना जिल्हा सामान्य रुग्णालय येथे तपासणी झाल्याचे प्रमाणपत्र आहे. याची माहिती जुना मोंढा येथील एका किराणा दुकान चालकाने जिल्हा नियंत्रण कक्ष आणि जिल्हा आरोग्य यंत्रणा, पोलिस प्रशासन यांना कळविले.

दोन तासानंतर सदर बाजार पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, जिल्हा आरोग्य यंत्रणा आणि रुग्णवाहिका दुपार उलटून गेली तरी या कोरोनाच्या होम क्वारंटाइन रुग्णांकडे फिरकले नाही. त्यामुळे सकाळी ११ वाजल्यापासून सदर बाजार पोलिस ठाण्याचे एक कर्मचारी ही ताटकळत बसले. 

सर्वांची टोलवाटोलवी 

या रुग्णांसंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.मधुकर राठोड, पोलिस यंत्रणा, रुग्णवाहिका यांना कळविले. मात्र पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि रुग्णवाहिकेची वाट पाहत राहिले. मात्र इतर यंत्रणेने केवळ टोलवाटोलवी केले. त्यामुळे थेट जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांना या संदर्भात माहिती दिल्यानंतर दुपारी अडीच वाजता रुग्ण वाहिका दाखल झाली आणि त्या होम क्वारंटाइन रुग्णाला घेऊन गेली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT