File Photo 
मराठवाडा

जिल्ह्यातील उद्योग असे होणार सुरु 

शिवचरण वावळे

नांदेड : ‘कोरोना’मुळे देशात अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण देश लॉकडाऊन होता. या दरम्यान उद्योग, व्यवसाय ठप्प झाले होते. त्यामुळे शहरापासून ते ग्रामिण अर्थकारणाची चाके थांबली होती. थांबलेले हे उद्योगधंदे पुन्हा सुरु करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून सोमवारपासून (ता.२०) परवानगी दिली आहे. मात्र, नांदेड जिल्ह्यातील काही मोजकेच उद्योग व्यवसाय पूर्वपदावर येण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले.

नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लघु व मध्यम उद्योग सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सोमवारी परवानगी देण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात तीन टप्यात उद्योग सुरु होणार आहेत. शहरातील उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी उद्योजकांना सोशल डिस्टन्‍सिंगच्या नियमांची पायमल्ली होणार नाही व कामगारांची राहण्याची किंवा ये - जा करण्यासाठी सुविधा कशा पद्धतीने पुरविली जाणार याबद्दल हमी पत्र दिल्यानंतर त्यांना उद्योग व्यवसाय सुरु करण्याची मुभा दिली जाणार आहे.

अत्यावश्य सेवेची वाहतुक सुरु
दरम्यान, पहिल्याच दिवशी शेतीसाठी लागणारे औजारे साहित्याची दुकाने सुरु झाली होती. त्या शिवाय ग्रीन झोनमधील शहरामध्ये शिथिलता देण्यात आल्यामुळे जिल्ह्यातंर्गत अत्यावश्यक सेवा सुविधांची वाहतुक देखील सुरु झाल्याचे दिसून आले.

उद्योगाची थांबलेली चाके पुन्हा रुळावर येणार
सुरुवातीपासूनच खाद्यतेल, दालमील, फ्लोअर मिल सुरु ठेवण्यात आला होत्या. परंतु सोमवारपासून शासनाचे काही उद्योग, व्यवसाय सुरु करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे थांबलेली उद्योग व्यवसायाची चाके हळूहळू फिरण्यास सुरु झाली आहेत. त्यासाठी सर्वांनी कायद्याचे पालन करणे हे देखील महत्वाचे आहे.
- नरेश गोयंका, उद्योजक, नांदेड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Government RTI : माहिती अधिकार कायद्यात बदल होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार, अण्णा हजारेंच्या इशाऱ्यानंतर सरकारची नरमाई

IAS Officer Tukaram Mundhe : "मी आयएएसमधून निवृत्त होईन, पण सार्वजनिक सेवेतून कधीही निवृत्त होणार नाही,"; तुकाराम मुंढेंच्या विधानाने नव्या चर्चांना उधाण

Latest Marathi News Live Update : मालेगाव महापालिकेवर 'लँड जिहाद विरोध' जनआक्रोश मोर्चा

Mumbai: उघड्या मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू, BMC चा निष्काळजीपणा जीवावर बेतला... माणूस पडतानाचा Video समोर... बचावकार्य अपयशी

Mumbai Pune Red Alert : राज्यात मान्सूनची दमदार वाटचाल ! पुढील ४ दिवस पावसाचे; मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांत रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT